Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गंभीर कोरोना रूग्णांवर प्रथमच प्लाझ्मा थेरेपी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गंभीर कोरोना रूग्णांवर प्रथमच प्लाझ्मा थेरेपी

कोल्हापूरमधील हा पहिलाच प्रयोग

कोल्हापूर-(जिमाका) – कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या रूग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यात आला आहे. गंभीर, अत्यवस्थ कोरोना रूग्णांवर या प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत. राज्यात कोल्हापूरमध्ये बहुधा हा पहिलाच प्रयोग असावा. त्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

पुण्याहून आलेला आणि जिल्ह्यात सापडलेला पहिला कोरोना रूग्ण 18 एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाला आहे. या कोरोनामुक्त झालेल्या युवकाच्या मान्यतेने त्याच्या रक्तातील 550 मिली प्लाझ्मा घेण्यात आला आहे. याबाबत या रूग्णावर उपचार करणारे आणि अथायू रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सतीश पुराणिक यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, रोगमुक्त झालेल्या रूग्णाच्या शरीरामध्ये ॲन्टीबॉडीज तयार होतात. म्हणजे एखाद्या विषाणूने शरिरात प्रवेश केल्यावर शरिरातील सैनिक त्याच्याशी लढण्यासाठी सज्ज होतात. या कोरोनामुक्त झालेल्या रूग्णाच्या शरीरातून रक्त घेतलेल्या प्लाझ्मामध्ये या ॲन्टीबॉडीज  आहेत. म्हणजे एखादा गंभीर रूग्ण असेल तर त्याच्या शरिरातील विषाणूसाठी अतिरिक्त सैनिकांची कुमक या प्लाझ्माच्या माध्यमातून तयार ठेवण्यात आली आहे. याच सैनिकांच्या बळावर अत्यवस्थ रूग्णाचा जीव आपण वाचवू शकतो.

सीपीआरमधील रक्त पेढीचे तंत्रज्ञ रमेश सावंत म्हणाले, 14 दिवसांच्या कालावधीनंतर कोरोना रूग्णाच्या स्वॅबची दोनवेळा पुन्हा तपासणी केली जाते. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अशा कोरोनामुक्त रूग्णाचा प्लाझ्मा घेण्यात येतो. सद्या घेतलेला प्लाझ्मा इतर तपासणी करून रक्त पेढीत संकलित करण्यात आला आहे. हा प्लाझ्मा आवश्यकतेनुसार रूग्णाच्या उपचारासाठी वापरण्यात येईल.

कोरोना बाधित गंभीर, अत्यवस्थ रूग्णावर प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी आयसीएमआरकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे, असे सांगून हिमॅटोलॉजिस्ट डॉ.वरूण बाफना म्हणाले, तातडीच्या वेळी या प्लाझ्माचा उपचारासाठी उपयोग करू शकतो. सद्या उपचार घेत असणाऱ्या रूग्णांच्या सहमतीने काहीजणांच्या रक्तातील प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. भविष्यात हा प्लाझ्मा अत्यवस्थ रूग्णांवर उपचार करण्यासाठी उपयोगी पडणार आहे.

प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून कोरोना बाधितांवर उपचार करण्याचा हा कोल्हापुरमधील राज्यातील पहिलाच प्रयोग असावा. तांबड्या-पांढऱ्यासाठी, गुळासाठी वा चप्पलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापुरात हा प्लाझ्माचा प्रयोग यशस्वी ठरल्यास रांगडे कोल्हापूर वैद्यकीय क्षेत्रातही देशाला आपली वेगळी ओळख देईल.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कौटूंबिक हिंसाचार पिडीतांना नामांकित संस्थांकडून मिळणार ऑनलाईन मार्गदर्शन

Next Post

दुकानाचा परवाना रद्द जिल्हा पुरवठा अधिकारी यांची कारवाई;मद्यपान करुन धान्य वाटपासह अनेक होत्या तक्रारी

Next Post
दुकानाचा परवाना रद्द जिल्हा पुरवठा अधिकारी यांची कारवाई;मद्यपान करुन धान्य वाटपासह अनेक होत्या तक्रारी

दुकानाचा परवाना रद्द जिल्हा पुरवठा अधिकारी यांची कारवाई;मद्यपान करुन धान्य वाटपासह अनेक होत्या तक्रारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d