<
जागतिक मैत्री दिनविशेष – (हर्षल सोनार)- मित्रांनो हा लेख लिहण्या मागचे कारण म्हणजे आज जागतिक मैत्री दिवस.मित्रांनो आपल्याला मैत्रीचा मर्म सांगणार एक वाक्य सांगतो.
“Making a million friends its not miracle,miracle is make one friend who stands against million”
मित्र भरपुर जमवा पण त्यांची वेळोवेळी आपल्या कसोटी वर त्यांना आजमवुन पहा.कारण एकतर्फी मैत्रीला काही अर्थ नाही.
प्रत्येक व्यक्तिला सर्वात जवळचा असा कुणी वाटत असेल तर तो म्हणजे मित्र. मित्राशिवाय मनातल्या भाव-भावनांना दुसरं कुणी समजून घेईल का? जरी कुणी समजून घेतलं तर त्याला मित्र व्हावं लागतं नाही का?
आपल्याला मित्र असावा असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. पण मैत्री करताना पहिल्यांदा स्वतःच मित्र व्हावं लागतं. कुण्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री जुळविण्यासाठी गरज असते ती स्वत:वर विश्वास ठेवण्याची, जाती-पातीची बंधने झुगारण्याची, संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची, विशाल ह्रद्य, संवेदनशील मन जपण्याची, दुसर्यानां व्यवस्थितपणे समजून घेण्याची.
मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो! मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातुन निर्माण झालेले सुर! आणि खरा मित्र म्हणजे अनोळखी सुरातून निर्माण होणारे एक सुमधुर गाणं! मैत्री जुळते ओळखीमुळे, पण ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याच्या सुख-दु:खात सामील झाल्यानंतर जो “माणूस” तयार होतो तो खरा मित्र अन तिच खरी मैत्री!
खरे मित्र असतात ह्रद्याच्या ढासळलेल्या भिंतीना नव्यावे उभे करणारे कारागीर. आशेचे नवे नवे रंग देणारे रंगारी. मित्राच्या जीवनात प्रेरणा भरणारे प्रेरणास्तोत्र. मित्र वाईट मार्गाकडे जाताना रोखणारे, प्रसंगी टोकणारे, मित्राचे कौतुक करणारे! किती रुपं या मित्राची असतात नाही का?
मित्रांनो हा लेख लिहण्या मागचे कारण म्हणजे आज जागतिक मैत्री दिवस.मित्रांनो आपल्याला मैत्रीच मर्म सांगणार एक वाक्य सांगतो.
“Making a million friends its not miracle,miracle is make one friend who stands against million”
मित्र भरपुर जमवा पण त्यांची वेळोवेळी आपल्या कसोटी वर त्यांना आजमवुन पहा.कारण एकतर्फी मैत्रीला काही अर्थ नाही.
आजच्या बेरोजगारीच्या युगात तर गरज आहे, ती समाजाने बेकार ठरवलेल्या हुशार, सुशिक्षित ‘सुदाम्या’ला मैत्रीखातर त्याच्याजवळ पोहे जरी नसले तरीही त्याच्या एका ‘कट चहा’ वरूनच त्याची परिस्थिती जाणून घेऊन त्याला मदत करणार्या सखा श्रीकृष्णाची..