<
अमळनेर-(प्रतिनिधी) – तालुक्यात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच या उपक्रमशील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या व्हॉटस् अॅप गृपच्या माध्यमातून कोरोना मुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत अमळनेर शहरातील मोल मजुरी करणाऱ्यांवर लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ आलेली असतानाच हजारो लोकांना अन्नदानासाठी पुढे सरसावलेल्या वर्धमान संस्कार धाम, गोक्षेत्र प्रतिष्ठाण च्या भानूबेन शाह गोशाळेच्या मदतीस अमळनेर येथील उपक्रमशील शिक्षकांच्या सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच समूहाने अन्नदानासाठी पुढाकार घेऊन प्रशासनाचे आदेश तथा लॉकडाऊनच्या नियमांचे पालन व स्वत:ची काळजी घेऊन प्रत्यक्ष भेट होऊ शकत नसल्यामुळे व्हॉटस्अॅप गृपच्या माध्यमातून संपर्क करुन ऑनलाईनचा पर्याय स्विकारत शिक्षक दात्यांनी आपली रक्कम जमा केली व या उत्स्फूर्त सहयोगातून 67 शिक्षकांनी एकत्रितपणे ₹ 44100/- “सानेगुरुजी अन्नदान स्वेच्छानिधी” उभारुन आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले आहे.
या शिक्षकांनी दिला अन्नदान स्वेच्छानिधी अशोक इसे छाया इसे, चंद्रकांत देसले, आर.डी.महाजन, दत्तात्रय सोनवणे, डी.ए.धनगर, विलास पाटील, राजेंद्र पाटील, सुरेखा बोरसे, चंद्रकांत पाटील, जयश्री पवार, प्रविण पाटील, रामकृष्ण बाविस्कर, प्रतिभा बाविस्कर, गौरव बाविस्कर, भूषण महाले, बी.एस.पाटील, मंगला पाटील, रोहित पाटील, भैय्यासाहेब साळुंके, वसंत पाटील, दिलीप सोनवणे, ज्ञानेश्वर मोरे, विलास पाटील, प्रेमराज पवार, एस्.डी.देशमुख, अरुण मोरे, जगदीश पाटील, दिनेश मोरे, प्रदिप चव्हाण, संजय पाटील, प्रकाश पाटील, कुणाल पवार, वनिता शिसोदे, सुमित शिसोदे, अशोक पाटील, हरेश्वर सैंदाणे, श्रीस्वामी समर्थ, योगराज पाटील, संगिता शिंदे, शशिकांत आढावे, दिपक पाटील, राजेंद्र सोनवणे, रामेश्वर भदाणे, वाल्मिक मराठे, रेखा पाटील, भगवान पाटील, वंदना पाटील, गोपाल हडपे, दिपक भामरे, जे.एस्.पाटील, रणजित शिंदे, गणेश बोढरे, महेश बोरसे, रत्नाकर पाटील, छगन पाटील, निरंजन पेंढारे, ललितकुमार पाटील, विजय पाटील, छाया सोनवणे, अश्विन पाटील, मनिषा पाटील, विद्यादेवी कदम, हेमकांत लोहार, शरद पाटील, विशाल देशमुख, उमेश काटे
सदर जमा निधी सुपूर्द करण्यासाठी अमळनेर शहरातील हातावर पोट असलेल्या गोरगरीबांच्या जेवणाची पालकत्व म्हणून जबाबदारी स्विकारून 18 ते 20 ठिकाणी सुरु असलेल्या अन्नछत्रासाठी एकत्रित स्वयंपाक तयार करण्याचे मुख्य ठिकाण असलेल्या श्रीमती भानुबेन शहा गोशाळा, पळासदडे रोड अमळनेर येथील सेंट्रल किचन सेंटरवर गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन यांचे प्रमुख उपस्थितीत सानेगुरुजी शै.विचारमंचचे सदस्य एस्.डी.देशमुख, मंगला पाटील, छाया सोनवणे, विद्यादेवी कदम, वाल्मिक पाटील, रामकृष्ण बाविस्कर, डी.ए.धनगर, दत्तात्रय सोनवणे, उमेश काटे, शरद पाटील, संजय पाटील, रणजित शिंदे, योगराज पाटील, अशोक इसे, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील आदि उपस्थित होते.
दिवसेंदिवस अन्नदानासाठी शहराच्या विविध भागांतील गरजु कुटुंबातील लोकांची संख्या वाढतच चालली आहे. अशा वेळी शहरातील दाते गोशाळेतर्फे सुरू असलेल्या या अन्नक्षेत्र समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होऊन योगदान देत असल्याने या संकटकाळी गोरगरिबांच्या जेवणाची सोय होत आहे विविध क्षेत्रातील दात्यांनी असेच पुढाकार घेऊन अन्नदानासाठी सहकार्य करत रहावे असे गोशाळेतर्फे चेतन शाह, राजू शेठ, प्रा.अशोक पवार, महेंद्र पाटिल, संदीप घोरपडे, डी.ए.धनगर, रणजित शिंदे यांनी सांगितले आहे.