<
जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांद्रा बुद्रूक आज उपासक मनोज वसंत सोनवणे व उपासिका दीक्षा भाऊराव निकम यांचा आदर्श विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संपूर्ण देशात कोरना विषाणूने थैमान घातले असून अशा परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने सर्व विवाह सोहळ्याना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत सोनवणे परिवार व निकम परिवारातर्फे शासनाच्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टन नियमाचे पालन करीत पाच ते सहा नातेवाईक यांच्या साक्षीने तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करत विवाह सोहळा संपन्न करण्यात आला. या आदर्श विवाहाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांना आयुष्याच्या भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.