<
१३७ जणांची स्वेच्छेने नोदंणी केल्याची माहिती जिल्हा समन्वयक श्री. नरेंद्र यांनी दिली आहे
जळगांव(प्रतिनिधी)- येथील नेहरू केंद्राच्या वतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपातकालीन परिस्थितीत लढण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे तर जिल्ह्यातील नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत १३७ जणांची स्वच्छेने नोंदणी झाली आहे.
आपण कोविड योद्धा या अभियानात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन फॉर्म भरून राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊ शकता.
यामध्ये नोंदणी झालेल्या योद्धांना कोरोना विषाणूशी लढण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण दिले जाणार असून येत प्रामुख्याने नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवणे, नागरिकांनी परिस्थितीला घाबरून जाऊ नये म्हणून त्यांचे समुपदेशन करणे यांचा समावेश आहे. तसेच नोंदणी झालेल्या योद्धांपैकी ७६ जणांना आयगॉट पोर्टलद्वारे प्रशिक्षण दिले जाते. तर त्यातील १२० लोकांनी आधीपासून आरोग्य सेतु अॅप स्थापित केले आहेत. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सर्व प्रशासनाबरोबर काम करण्यास तयार आहेत. असे नेहरू युवा केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.