<
जामनेर / प्रतिनिधी –अभिमान झाल्टे
कोरोना महामारी भयानक आजाराला तोंड देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी ते आरोग्य,सेवक, सेविका, सफाई कर्मचारी पासुन पोलीस प्रशासन , आपल्या जिवाचे रान करीत आहे .
आपला देश या महामारीतुन मुक्त व्हावा हि इच्छा बाळगुन नागरीकांना घरी राहा , सुरक्षित राहा, आपल्या परीवाराचे रक्षण करा, असे आवाहन करतात, पण हेच मानवी ईश्वर दुत बनुन आपला परीवार सोडून कोरोना रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत आहे .
व दुसरीकडे पोलीस कर्मचारी अती जास्त तापमान उन्हाची पर्वा न करता खेडोपाडी तासंतास आपले कर्तव्य बजावतांना दिसत आहे .
अशा देशाच्या नागरीकांच्या सेवा करणाऱ्या डॉक्टर्स , पोलीस कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेत धडाडीची व सेवाभावी अशी जामनेर शहर मेडिकल होमीओपॅथिक संघटना व पुष्पा मेडीकल एजन्सी यांनी पुढे येत .
यांच्या उदांत भावनेतुन आयुषमान मंत्रालय प्रणित रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मेडीकल ऑफीसर्स कम्युनिटी, असलेल्या औषधींचे वितरण करण्यात आले .
जामनेर पंचायत समिती येथे तालुका वैद्दकीय अधिकारी डॉं राजेश सोनवणे यांच्या दालनात डॉ .पिंजारी व त्यांच्या सहकार्यांना औषधी बद्दल माहिती देवुन औषधांचे संच त्यांच्या स्वाधीन करण्यात आले . तसेच जामनेर पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार किशोर पाटील यांना सुद्धा माहिती तसेच औषध वाटप करण्यात आले .
त्यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष .डॉं मनोज विसपुते यांनी पत्रकारांना बोलतांना आरोग्य विभाग कर्मचारी, नगर पालिकेचे सफाई कामगार, पत्रकार, तसेच देशाच्या हिता संबंधी सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवकाला या औषधींचे वितरण करण्याचा मानस आमच्या संघटनेचा आहे .
सध्या कोरोना विषाणु बाबत जनजागृती करीत शासनाने सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन करावे . सुरक्षित अंतर ठेवुन आपल्या परीवाराची काळजी घ्यावी . आमच्या कडुन समाजाचे काही देणे लागते या लोकहित वादी संकल्पनेतुन हा उपक्रम करीत आहोंत . असे त्यांनी सांगितले .
या रोगप्रतिकार औषधाचे वितरणा प्रंसगी उपस्थितअध्यक्ष – डॉं .प्रमोद पाटील, उपाध्यक्ष डॉ . सुरेश सोनवणे, सचिव विकास कळसकर, डॉ . अविनाश कुरकुरे, डॉ . के .एम. जैन, डॉं . अविनाश पाटील, डॉ . पवन पाटील, डॉ . इंगळे, व पुष्पा मेडीकलचे संचालक निलेश शर्मा , आदी सदस्य उपस्थित होते .