<
दिनांक: २४ एप्रिल २०२०, मुंबई प्रतिनिधी
आज भारतासह जगासमोर कोरोना विषाणू संक्रमणाचे मोठे संकट उभे आहे. वरच खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने गेल्या महिन्याभरापासून लॉकडाउन स्वीकारण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्वच क्षेत्रे आज बंद आहेत. शाळा, महाविद्यालये सुद्धा बंदच आहेत. पण विद्यार्थ्यांचा शिक्षणासोबत संपर्क तुटू नये याकरिता बहुसंख्य कॉलेजमार्फत ऑनलाईन शिक्षणप्रणाली अवलंबण्यात आली आहे. शिक्षकांचे काम सुद्धा चालूच आहे.
बहुतांश लोक लॉकडाउन कालावधीमध्ये नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये कौशल्य विकास व्हावा व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख त्यांना व्हावी या उद्देशाने brightwayz समूह व त्यांचे संचालक श्री. निकेतन तावरे यांनी आगळावेगळा असा “स्किल क्रांती” नामक एक ऑनलाईन उपक्रम चालू केला आहे. यामध्ये मुंबई तस्सेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. आजपासून या उपक्रमाला सुरवात झाली आहे. आज श्री. निकेतन तावरे यांनी प्रेझी या सॉफ्टवेर चा वापर कसा करावा या बद्दल मार्गदर्शन केले. आज २ भागांमध्ये सेमिनारचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले.
आजच्या ऑनलाईन सेमिनारचा बहुतांश शिक्षक व विद्यार्थ्यांना फायदा झाला व भविष्यातही अशा प्रकारचे भरपूर कौंशल्य विकास करण्यासाठी उपयुक्त असणारे उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी माहिती brightwayz समूहाच्या संस्थापक श्रीमती निर्मला तावरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
हा सेमिनार यशस्वी करण्यासाठी डॉ. श्रद्धा भोमे, श्री. अनिल तिवारी, श्री. गौरव सावंत आणि श्री. शौनक सरदेसाई यांचे सहकार्य लाभले.
आजचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थीचे तसेच सहकाऱ्यांचे संचालक श्री. निकेतन तावरे यांनी सत्यमेव जयतेच्या माध्यमातून आभार व्यक्त केले.