<
जळगाव-जैन इरिगेशन सिस्टिम्स ली, भवरलाल अँड कांताई जैन फौंडेशन आणि गांधी रिसर्च फौंडेशन च्या वतीने लॉक डॉउन काळात गरजू, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबासाठी स्नेहाची शिदोरी 2 एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे.
यात सकाळी 5500 हुन अधिक तर सायंकाळी 3500 हुन अधिक कुटुंबास ही शिदोरी देण्यात येते ,आज कांताई हॉल येथील वितरण केंद्रास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन वितरण व्यवस्था समजून घेतली, तसेच आतापर्यंत वितरित झालेले भोजन पाकीट, कोणत्या परिसरात वितरण , अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ज्युस वाटप आणि इतर माहिती घेऊन जैन उद्योग समूहाच्या या सेवकार्याविषयी आदर व्यक्त केला , यावेळी नगरसेवक अमर जैन , अनिल जोशी व वितरण व्यवस्थेतील जैन इरिगेशन चे सर्व सहकारी उपस्थित होते.