<
दिनांक २५, मुंबई प्रतिनिधी,
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये “कोविड-१९” या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात “कोविड-१९” बाधित रुग्णांकरिता उपचार सुरु असलेल्या रुग्णालयांमध्ये सुरक्षा विषयक सेवा देण्याकरिता “कंत्राटी सुरक्षा रक्षक” हि पदे माजी सेवानिवृत्त सैनिकांमधून फक्त सहा महिन्याच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यासाठी अर्ज मागवण्यात येतव आहेत. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्तेच्या साक्षांकित छायांकित प्रति व अलीकडेच काढलेले पासपोर्ट आकाराचे स्वतःचे छायाचित्र अर्जाबवर चिकटून विहित नमुन्यातील अर्ज दिनांक २५/०४/२०२० ते दिनांक २८/०४/२०२० पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते सायं. ६.०० पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, गेट क्रमांक-७, फोर्ट, मुंबई-४००००१ किंवा [email protected] या ई-मेल वर सादर करावेत
अर्जांचा नमुना माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://portal.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/RR-24042088-300420.pdf