<
पाचोरा =(किशोर रायसाकडा) सवंत्र कोरोना या जीवघेण्या विषानुने कहर माजवला असताना शासकीय यंत्रणा अलर्ट असताना शहरातील नागरिकांना या गोष्टीचे कुठेच गाभिॅय दिसत नाही, सोशल डिस्टंट नागरिकांना अजुनही समजेनासे आहे,
शासन पुणॅपने खबरदारी घेत असताना नागरिकांनी सुध्दा खबरदारी घेणे आवश्यक आहे, परंतु भाजी विक्रेते किराणा दुकाने यांना जो टायमिंग दिला आहे आकरा ते सायंकाळी पाच हा वेळ खुप मोठा देण्यात आलेला आहे एक दिवसाच्या गॅपने नियोजन केले तर कोरोना विषानु या जीवघेण्या आजाराला निश्चीतच रोखले जाईल असे मत सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले यांनी व्यक्त केले आहे.
लॉगडाऊनचा फज्जा उडतोय याच्या मागील कारण पोलीस व सुरक्षा यंत्रणा नसून केंद्र सरकार व राज्य सरकार आहे त्यांचे वारंवार निर्णय बदलत आहेत
या बदलत्या निर्णयामुळें व केंद्र व राज्य सरकारच्या राजकारणाच्या गुप्त डावपेचांचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे
तसेच कायदाचे रक्षक फक्त कायदा पाळणारांवरच कारवाई करतात परंतु दुसरीकडे गुंडागीरी करणारे मोकाट आहेत
कोरोणासारख्या भिषण संकटातही राजकारण केल जातय यात भविष्यात मरणार आहे फक्त सर्वसामान्य जनताच