<
जळगाव – (प्रतिनिधी) – लॉकडाउन मुळे रिक्षावाल्यांचा रोजगार बंद असल्याने , लोकसंघर्ष मोर्चा च्या वतीने आज जळगाव शहरातील 50 रिक्षाचालकांना लेवा भवन येथे अतिशय शिस्तबध्द पध्दतीने विशेषतः 5 महिला रिक्षा चालक व 2 अपंग रिक्षाचालकांसह 50 रिक्षा चालकांना फिजिकल डिस्टनसिंग चे पालन करीत किराणा किट चे वाटप करण्यात आले . या किट मध्ये गहू, तांदूळ तेल ,तूरडाळ ,साखर,चहा पावडर यांचा समावेश होता . या वेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा मा. प्रतिभाताई शिंदे , अमोल कोल्हे , डॉ. सुष्माताई चौधरी , दिलीपभाऊ सपकाळे व मित्रपरिवार उपस्थित होते . प्रतिभाताई शिंदे यांनी भास्कर फाउंडेशन च्या वतीने 800 व लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने 1200 असे सुमारे 2000 किराणा किट चे वाटप सुप्रीम कॉलनी , निमखेडी , खोटे नगर परिसर , शाहू नगर , आशाबाबा नगर , कासमवाडी , तुकाराम वाडी , पिंप्राळा ,पिंप्राळा हुडको , समता नगर , कांचन नगर , गेंदालाल मिल , तांबापुरा , हरिविठ्ठल नगर , उस्मानिया पार्क यासह जळगाव शहरातील विविध भागांमध्ये केलेले आहे . याकामी सचिनभाऊ धांडे , अमोल कोल्हे , प्रमोद पाटील, नाना महाले, योगेश पाटील , राजुभाऊ मोरे, दिलीपभाऊ सपकाळे, फारुख कादरी , आनंदाभाऊ तायडे, अकिल खान कासार , भारत सोनवणे, जुबेर खाटीक, ममताताई सोनवणे , ममताताई तडवी,अजय तडवी, कैलास मोरे, रफिक पिंजारी, दामू भारंबे व लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते नेते यांनी सहकार्य केले . ह्या सोबतच लोक संघर्ष मोर्चा जिल्ह्यातील नागरिकांच्या रेशन वाटपासाठी असलेल्या समस्या सोडवण्या कामी ही मदत करीत असून , यापुढेही रेशन संदर्भातील काहीही समस्या असल्यास ती सोडवणार आहेत .त्यासाठी लोक संघर्ष मोर्चा आपला हेल्प लाईन नंबर देणार आहे तिथे संपर्क करण्याचे आवाहन ही करीत आहे .