<
पुरुषोत्तम दासजी महाराज मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे जिल्हा दंडाधिकारी श्रीमती. अनुग्रह पी. यांना दिले निवेदन
विरोदा विरोदा(किरण पाटील) – पालघर जिल्ह्यातील गडचिंचले या गावी जमावाने दोन संत कल्पवृक्ष स्वामी, सुशिल गिरी व त्यांचे चालक नितीन तेलगीडे यांची गाडी कांदिवली आश्रमातून सुरतला जाण्यासाठी निघाली होती. स्वामींची गाडी संचारबंदी मुळे दादर नगर हवेली च्या सीमेवरून जात असताना पालघर येथून ११० किमी अंतरावरील गडचिंचले गावातील हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून स्वामीजींची हत्या केली. पोलिसांसमक्ष ही घटना घडणे लज्जास्पद आहे व सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येऊन हल्लेखोरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अश्या प्रकारच्या राक्षसी हल्लेखोरांचा संतमहंत तीव्र शब्दात निषेध करत आहे. यात सहभागी असलेल्या सर्व आपरोलीना कठोर शिक्षा देऊन यापुढे अश्या घटना घडणार नाहीत या साठी शासनाने कठोर कार्यवाही करावी अश्या मागणीचे निवेदन फैजपूर खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांनी माननीय राज्यपाल,मध्यप्रदेश यांच्या नावाने जिल्हा दंडाधिकारी श्रीमती. अनुग्रह पी. शिवपुरी मध्यप्रदेश यांना देण्यात आले. यावेळी फैजपूर खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास जी महाराज यांच्या समवेत भानुप्रकाशसिंग, विनोदपुरी गोस्वामी, रामदीर कुशवा, पप्पू यादव, शिवपुरी ( मध्यप्रदेश ) आदी सह संत महातांची उपस्थिती होती.