<
नवी दिल्ली : (वृत्तसंस्था) – “स्वदेशी वापरा” चा नारा देणाऱ्या पतंजलीने आपले नवीन सिम बाजारात आणले असून ते प्रत्येक टेलिकॉम कंपनीला डोकेदुखी ठरणार आहे. पतंजलीने इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत सिमची भन्नाट योजना आणल्याने इतर टेलिकॉम कंपन्यांना चांगलेच मारक ठरणार आहे.
बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे अनेक उत्पादने मार्केट मध्ये उपलब्ध असून त्यांनी पतंजलीचे नवीन सिम मार्केट मध्ये आणण्यापूर्वी सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएलशी संपर्क साधून पतंजलीचे नवीन सिम लॉन्च केले आहे.
ग्राहकांना १ महिन्यासाठी केवळ १४४ रुपयचे रिचार्ज करावे लागतील, ज्यामध्ये दररोज अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 2GB डेटा आणि १०० संदेश मिळणार आहेत. जर ग्राहकांना यापेक्षा मोठी योजना घ्यायची असेल तर ७९२ रुपये द्यावे लागतील ज्यामध्ये ६ महिन्यांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉल 2GB दररोज आणि १०० संदेश मिळतील अशा अनेक योजना घेऊन पतंजली आता टेलिकॉम मार्केटवर कब्जा करेल का हे पाहणे औचित्याचे ठरेलं.इतर टेलिकॉम कंपंन्यांनी वाढवलेली रिचार्ज ची रक्कम चा फायदा पतंजली घेऊ शकते.