<
दिनांक- २५ एप्रिल २०२०, ठाणे प्रतिनिधी
आज भारतासह संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणू संक्रमणाच्या विरोधात निकराने लढा दिला जात आहे. केंद्र तसेच राज्य सरकार सुद्धा आपापल्या परीने उत्तम कामगिरी करत आहेत. अंबरनाथ शहरामध्ये सुद्धा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ नये म्हणून अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष श्री. सुनील चौधरी यांनी दंड थोपटले आहेत. अंबरनाथमधील संपूर्ण नगर व शहरात दिवसरात्र फिरून संपूर्ण शहराचे सॅनिटाईझ करण्यात आले. गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून देशामध्ये लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. त्यामुळे कष्टकरी व मजूर वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. याच गोष्टीची जाणीव ठेवून गोरगरीब व गरजू कुटुंबाना घरपोच अन्नधान्य श्री. सुनील चौधरी यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.
अंबरनाथ कोरोनमुक्त करण्यामागे अंबरनाथ शहराचे माजी नगराध्यक्ष श्री. सुनील चौधरी साहेब, अंबरनाथचे तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन तसेच वैद्यकीय सेवा देणारे डॉ. गणेश राठोड साहेब व सर्व कर्मचारी या सर्वांचा मोलाचा वाट आहे. हि मंडळी नसती तर काय झाले असते ? अशी माहिती अंबरनाथचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दिली. तसेच सत्यमेव जयतेच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचे आभार व्यक्त केलें.