<
दिनांक: २६ एप्रिल २०२०, डोंबिवली
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली रेड झोनमध्ये आलेले असताना कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिकेला उपलब्ध करून दिलेल्या आर. आर. हॉस्पिटलमधील असुविधांबाबत सोशल मीडियावरील पोस्टने शिवसेना विरुद्ध मनसे राजकारणाला तोंड फुटले आहे. श्री संजय हेंद्रे चौधरी यांना व त्यांच्या ३ नातलगांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याने महानगरपालिकेने सामंजस्य कराराद्वारे कोविड हॉस्पिटल म्हणून निश्चित केलेल्या नियॉन हॉस्पिटल येथे उपचार चालू होते. दिनांक २३-०४-२०२० रोजी कोरोना पॉसिटीव्ह असलेले व डायलिसिस उपचार घेत असलेल्या दोन व्यक्तींना नियॉन ( कोविड) हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आल्याने, संबंधित श्री चौधरी व नातलगांना महापालिकेने कोविड हेल्थ सेंटर ची सुविधा असलेल्या बाज. आर. आर. हॉस्पिटल येथे स्थलांतरित करण्यात आले. संजय हेंद्रे चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्ये आर. आर. हॉस्पिटलमधून आम्ही जिवंत बाहेर येऊ कि, आमच्या डेड बॉडीज बाहेर येतील. असा सवाल करीत असुविधांचा पाढा वाचला. हॉस्पिटलला भाड्यापोटी मिळणाऱ्या १० लाख रुपयांसाठी आ. पाटील यांनी करार केल्याचे आरोप केले गेले.
बाज. आर. आर. हॉस्पिटल्सही महानारपालिकेने करार केला असून संबंधित हॉस्पिटल हे कोविड हेल्थ सेंटर म्हणून निश्चित केलेले आहे. महानगरपालिकेने सादर हॉस्पिटल मध्ये कोरोनाबाधित उपचार होण्याच्या दृष्टीने नव्याने सुविधा विकसित केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आयसीयू वातानुकूलित यंत्र, ३५ एक्सझोस्ट फॅन, २० एलईडी बॉब, १० एअर सर्क्युलर फॅन, १० पेडेस्टल फॅन, १० गिझर, ५ सिलिंग फॅन, आवश्यक विद्युत उपकरणे वायरिंग, पार्टीशन, एक्झहोस्ट खिडक्या, मंडप, बॅरिकेड्स, खुर्च्या, मच्छरदाणी, ऑक्सिजन पाईपलाईन इत्यादी गोष्टींचा संभवेश असून त्यास्तही महापालिकेने ३१ लक्ष खर्च केले आहे.
बाज. आर. आर. हॉस्पिटल यांच्याशी झालेल्या सामंजस्य करारानुसार सदर हॉस्पिटलमध्ये आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे, रुग्णाची देखभाल व उपचार करणे, पिण्याचे पाणी, जेवणाची व्यवस्था व इतर आवश्यक सुविधा पुरविण्याची जबाबदारी हि बाज. आर. आर. रुग्णालयाची आहे. त्यामुळे सादर तक्रारींवर त्यांचा खुलासा मागविण्यात आला आहे.
निऑन हॉस्पिटल येथे जागा उपलब्ध झाल्यानंतर श्री. चौधरी यांच्या आग्रहावरून पुन्हा निऑन हॉप्सिताल येथे दिनांक २४-४-२०२० रोजी थलांतराईत करण्यात आले आहे व त्या ठिकाणी त्यांचे उपचार चालू आहेत अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्यावतीने सत्यमेव जयतेला देण्यात आली.