स्वत:ची काळजी घ्या, कोरोना विषाणूला घाबरु नका!
समाजात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषाणूंची दहशत असते. अलिकडे 152 देशांमध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली आहे. विषाणूंचा समुह म्हणजे कोरोना व्हायरस. हा माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. माणसांमध्ये आढळलेल्या अनेक विषाणूंपेक्षा वेगळा आहे म्हणून याला नोवेल कोरोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होत असला तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे. कोव्हीड-19 असे त्याला नाव दिले आहे. हा आजार साध्या ल्यू सारखा आहे. बाधीत रुग्णाच्या सहवासात आल्याने सर्वच वयोगटातील रुग्णांना लागण होण्याचा धोका असतो. आजच्या घडीला 60 वर्ष वयोगटापुढील व्यक्ती, मधुमेह, हदयरोग, कॅन्सर, फुप्फुसाचे आजार, रक्तदाब असणा-यांना बाधा होण्याची शक्यता आधिक आहे. याशिवाय ज्यांनी कोविडचे लसीकरण केले, अशा व्यक्तींना लागण होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत कमी असतो. हा विषाणू प्रामुख्याने खोकतांना आणि शिंकतांना उडणा-या थेंबातून पसरतो. अशा थेंबातून 3 फुटापर्यंत हा विषाणू पोहोचू शकतो. त्यामुळे एक दुस-यांशी संवाद साधतांना 3 फुट अंतराच्या पूढे राहणे योग्य ठरते. हा विषाणू श्वसन मार्गाव्दारे घशातून फुप्फुसात जातो आणि नंतर रुग्णाच्या गंभीर स्थितीत न्युमोनिया (श्वसनदाह) होऊन श्वासाला त्रास होऊ लागतो. विषाणू 14 दिवस जिवंत राहतो. या 14 दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखव होणे, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास, ही लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. डॉक्टरांना संशयीत लक्षणे आढळल्यास चाचणी करुन घेतात आणि मोफत औषधोपचार करतात. या आजाराकरिता विशेष औषधे नाहीत. ताप, खोकला आणि घसादुखी याकरिता जी औषधे दिली जातात तीच औषधे या आजाराकरिता दिली जातात. श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास, श्वास ऑक्सीजनची पातळी ...