Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

Kce’s IMR मध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते क्रिडा पारितोषिक वितरण आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव– के.सी.ई. चे आय.एम.आर. येथे क्रिडावेध या वार्षिक खेळ महोत्सवाचा बक्षिस समारंभ संपन्न झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सिंधुताई सपकाळ, के सी ई चे सदस्य डी.टी.पाटील, के सी ई चे प्रशासकीय अधिकारी शशीकांत वडोदकर, डि बी महाजन, आणि आय एम आर च्या संचालक प्रा डॉ शिल्पा बेंडाळे होत्या.

त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना फक्त खेळाचाच नाही तर आयुष्याचा गुरुमंत्र देते..असे सिंधुताई सपकाळ म्हणाल्यात पुढे त्या म्हणाल्या,  माफ करायला शिका. या खान्देशातील बहिणाबाई ने मला शिकवले. तिच्या कवितेने मला सांभाळले. पुढे जा पण मागे वळून पहा.. पुढे त्या म्हणाल्या “आज २२ देशात जाऊन आले.. कसे दिसते हे महत्वाचे नाही, आयुष्यातील काटे सहन करा. मुलींनो कपड्यांचे भान ठेवा. तुमच्याकडे बघतांना मादी आठवायला नको.. माय आठवली पाहिजे…काळजाचे घाव ओळखायला शिका..मला स्वतःच्या बाळाची नाळ स्वतःच्या हातांनी तोडताना १६ घाव घालावे लागले.. पण आज २८२ जावाई आहे.. ४५० सुना आहेत.. बाईची जात फार सोशिक. मी माझ्या आयुष्यात पहिले काम केले माझ्या पतीला माफ केले. ज्यांनी हाकलले त्या माहेर सासरला माफ केले. कुणी कुणाचे नसते.. पतीला म्हणाले आता मी तुमची पत्नी नाही होऊ शकत.. पण आई होऊ शकते. आले ना ते सुध्दा माझ्याकडे.. चार राष्टपतींनी मला सन्मानित केले. पण मी कधी ग्रॅन्ड मागितले नाही. जिथे देवाजवळ दिवा जळत असतो तिथे आई मरत नाही.. माझ्याकडे आलेले कुठलेही बाळ मेले नाही. कसे दिसता हे महत्वाचे नाही, कसे आहात ते महत्वाचे आहे.

याप्रसंगी बुध्दीबळ स्पर्धेत अंतरराष्टीय स्तरावर वैभव बडगुजर, क्रिकेट मध्ये प्रद्युम् महाजन, नॅशनल स्पर्धेत साॅफ्ट बाॅल रचना मस्के, अंतरविद्यापिठ पाॅवरलिफ्टींग मध्ये शितल महाजन, ज्युडो स्पर्धेत कशीश भानुशाली, फुटबॉल मध्ये नबील शेख आणि स्वप्नील निरजकर, आंतरविभागिय टेबलटेनीस स्पर्धेत आदित्य चौधरी, महाराष्ट्र स्टेट स्पर्धेत वेदात पाटिल यांना सन्मानित करण्यात आले. तसेच क्रिडावेध मधील सहभागी ४५० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. याप्रसंगी डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सिंधुताई सपकाळ यांची ओळख डॉ शमा सराफ यांनी करुन दिली. बक्षिस समारंभाचे सुत्रसंचलन आणि आभार फिजीकल डायरेक्टर प्रा निलीमा पाटील यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ए.टी. झांबरे विद्यालयात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम

Next Post

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी पोवाड्यातून जागवली शिवशाही

Next Post

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी पोवाड्यातून जागवली शिवशाही

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo