Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एसटी प्रवास होणार सुखकर; लवकरच सेवेत ई-बस दाखल

user by user
09/08/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी)

दररोज एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ‘ई-बस’ ही नवीन योजना राबवित असल्यामुळे प्रत्येक नागरिकाचा प्रवास सुखकर करण्यासाठी शहरात लवकरच १०० इलेक्ट्रिक बस सेवेत दाखल होण्याचे वृत्त आहे.

याआधी नागरिकांना जुन्या ‘लालपरी’ डिझेल बसेसने प्रवास करताना दरवाजे, खिडक्यांचा खडखडाट आणि इंजिनचा घरघराट सहन करावा लागत होता. परंतु आता या नवीन तंत्रज्ञानाच्या चार्जिंगयुक्त बसेसमुळे सर्वसामान्य लोकांची या समस्येपासून सुटका होण्याबरोबरच प्रदूषण कमी होईल. सध्या जिल्ह्यातील ११ आगारांमध्ये सुमारे ८०० च्या वर लालपरी डिझेल बसेस प्रवाशांची सेवा करीत आहेत.

एसटीच्या ७५ व्या वर्धापनदिनी पुणे, मुंबईसारख्या महानगरात इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या धर्तीवर महामंडळ प्रशासनाचे जिल्ह्याच्या व्याप्तीनुसार बसेस देण्याचे धोरण आहे. त्यानुसार जिल्हा परिवहन विभागाकडून ४९ बसेसच्या मागणीत वाढ करण्यात आली असून, १०० ई-बसेसचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

निमआराम बसच्या प्रवासी भाड्यानुसार या ई-बसेससाठी प्रवासी भाडे आकारणी होईल, ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ होणार असल्याची माहिती एसटी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.

user

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड (CBHFL) मध्ये ०५ जागांसाठी भरती

Next Post

वावडदा येथे साईकलिस्ट ग्रुप चे स्वागत

Next Post

वावडदा येथे साईकलिस्ट ग्रुप चे स्वागत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d