Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

RFO मनोज कापूरे सह दोघ आरोपींना दोन दिवस पोलीस कस्टडी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2025
in क्राईम, जळगाव
Reading Time: 1 min read
RFO मनोज कापूरे सह दोघ आरोपींना दोन दिवस पोलीस कस्टडी

 

पारोळा- (प्रतिनिधी)-दि. ६ ऑगस्ट २०२५
बांबू लागवड प्रकरणात शेतकऱ्याकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) मनोज बबनराव कापूरे, लिपिक निलेश मोतीलाल चांदणे आणि कंत्राटी चालक कैलास भरत पाटील या तिघाही आरोपींना पारोळा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी रिमांड सुनावली आहे.

शेतकऱ्याच्या शेतजमिनीत अमृत महोत्सवी वृक्ष लागवडीसाठी मंजुरी मिळवून देण्याच्या मोबदल्यात आरोपींनी ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३६ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली गेली. सदर रक्कम कैलास पाटील या कंत्राटी कर्मचाऱ्याने पंचासमक्ष स्वीकारताच तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या पथकाने दिनांक ५ रोजी रंगेहात अटक करण्यात आली आहे.

घटनेचा तपशील

तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी सडावण शिवारातील जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडे अर्ज केला होता. त्या मंजुरीसाठी RFO मनोज कापूरे यांनी प्रत्येकी १०,००० रुपये प्रमाणे चार फाईल्ससाठी ४०,००० रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदाराने ५ ऑगस्ट रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केल्यानंतर, सापळा रचण्यात आला. त्यानुसार आरोपींनी ३५,००० रुपये स्वतःसाठी व १,००० रुपये लिपिकासाठी अशी रक्कम निश्चित केली होती. सदर रक्कम कैलास पाटील याने स्वीकारली.

लीस तपास सुरू

तिघाही आरोपींविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे (ला.प्र.वि., जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे.

या प्रकरणात लाच स्वीकारण्यामागील साखळी, मंजुरी प्रक्रियेतील अनियमितता, तसेच इतर संभाव्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रिमांडची मागणी केली होती. त्यामुळे दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सपाटून परिणामकारक कारवाई

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर, तसेच पोलीस अधीक्षक मा. श्री. भारत तांगडे आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असुन या कारवाईमुळे सामाजिक वनीकरण विभागातील व्यवहारांतील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, लाचखोरीविरोधातील प्रशासनाची गंभीर भूमिका अधोरेखित झाली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह २ जण ताब्यात;३६ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई

Next Post

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

Next Post
जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d