Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय लेवा पाटिदार युवक महासंघाची विस्तार नियोजन बैठक संपन्न भुसावळ तालुकाध्यक्ष पदी अक्षय बेंडाळे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
अखिल भारतीय लेवा पाटिदार युवक महासंघाची विस्तार नियोजन बैठक संपन्न भुसावळ तालुकाध्यक्ष पदी अक्षय बेंडाळे

जळगांव(प्रतिनिधी)- भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यांच्या विविध गावांमधील असंख्य तरुण अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघात प्रवेश करण्यास ईच्छुक आहेत त्या पार्श्वभुमीवर पदविस्तार व नियोजन करण्यासाठी आढावा बैठक नागेश्वर मंदिर वरणगाव येथे घेण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सप्तश्रृंगी माता, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला वंदन करून व प्रदेशाध्यक्ष प्रदिप भोळे व जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित युवकांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष प्रदिप भोळे, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे, प्रदेश सदस्य निखिल रडे, जिल्हा सदस्य अविनाश बऱ्हाटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कोल्हे यांनी केले त्यामध्ये त्यांनी सांगितले, आज लेवा समाज बांधवांनी एकत्र येणे व कुठेही समाजावर अन्याय होत असल्यास त्याठिकाणी आवाज उठवणे समाजबांधवांना सहकार्य करणे हि काळाची गरज आहे. तसेच समाजकार्याची आवड असणाऱ्या चांगल्या युवकांनी मोठ्या संख्येने महासंघात यावे असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्रदीप भोळे यांनी ग्रामीण भागातील बहुतांश लेवा समाजाचा शेती हा पिढीजात व्यवसाय असुन शेती बरोबरच पूरक जोड धंदा व आधुनिक शेती केल्याने युवक बरोजगारी वर मात करून समाजाची उन्नती होईल आणि गावोगावी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या शाखा लावणे व समाजकार्याची पद्धत आदि विषयांवर मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित युवकांनी स्वतःचा परिचय करुन दिला. भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यांमध्ये महासंघाच्या 20 शाखा युवकांनी तयार केलेल्या असुन लवकरच त्या शाखांचे उदघाटन करण्यात येणार आहे व सरदार वल्लभभाई पटेल जयंती पर्यंत 100 शाखांचे अनावरण करण्याचे महासंघाचे नियोजन व उद्दिष्ट आहे. उपस्थित सर्वानुमते आचेगावचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय बेंडाळे यांची भुसावळ तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली व प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋषिकेश कोलते यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केले. कार्यक्रमात अक्षय बेंडाळे, ऋषिकेश कोलते, आकाश पाटील, रोशन इंगळे, सागर पाटील, मयूर इंगळे, विशाल पाटील, प्रदीप वारके, कुणाल नेमाडे, नरेंद्र पाटील, शुभम पाटील, रुपेश पाटील, प्रतीक इंगळे, प्रणव पाटील, लोकेश पाटील, संकेत वारके, प्रवीण इंगळे, प्रथमेश पाटील, जितेंद्र पाटील, ऋषिकेश पाटील, विशाल नेमाडे, विष्णू इंगळे, चेतन भोळे, कल्पेश पाटील, लोकेश खाचणे, शुभम खर्चे, दशरथ पाटील, गोविंदा पाटील, देवेंद्र इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

एकलव्य आदिवासी क्रांती दलाच्या वतीने जामनेरात आदिवासी मेळावा संपन्न

Next Post

अखिल भारतीय जिवा सेना नाभिक संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

Next Post
अखिल भारतीय जिवा सेना नाभिक संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

अखिल भारतीय जिवा सेना नाभिक संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d