Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अग्निहोत्र अवैज्ञानिक, अंनिस, मविपचा दावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : शहरात जागतिक अग्निहोत्र दिनानिमित्त १५ मार्च रोजी सामुहिक अग्निहोत्रचे आयोजन करण्यात आले आहे. हे अग्निहोत्र वैज्ञानिक कसोटीवर उत्तीर्ण झाले नसून ते अवैज्ञानिक आहे. या अग्निहोत्राद्वारे आजार बरा होतो हा दावा नागरिकांची दिशाभूल करणारा असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शाखेसह मराठी विज्ञान परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

अग्निहोत्र हे सिद्ध सायन्स म्हणजे विज्ञान म्हणुन पुढं येत आहे. एखादं विधान आपण विज्ञान म्हणुन सिद्ध करा, असे म्हणतो तेव्हा ते विधान अनेक कसोट्यांवर तपासावे लागते. पहिली कसोटी निरीक्षण, ती वस्तु तपासावी. अग्निहोत्र प्रक्रियेत गायीचे शेण, गाईचे तूप व चिमूटभर तांदुळ वापरतात. यांचे परिक्षण केले असता, हे सर्व पदार्थ जैविक व सेंद्रिय आहेत. त्यात कार्बनी संयुगे असतात. अग्निहोत्र करताना त्या पदार्थांचे ज्वलन केले जाते. ज्वलनासाठी आक्सिजन या वायुचा वापर होतो. ज्वलनाने कार्बन-डाय आक्साईड, कार्बन मोनाक्साईड व इतर प्राणघातक आॅक्साईड यासारखे वायु बाहेर टाकले जातात. स्वाभाविकच वायुप्रदूषण होते. प्रदुषण कमी होत नाही,हे सत्य आहे. अग्निहोत्र केल्याने वातावरण शुद्ध होते (खरं म्हणजे होतच नाही) असे क्षणभर मानू, पण दोन चिमुट तांदुळ, थोडं तूप आणि थोडं शेण यांच्या ज्वलनाने पृथ्वीवर असलेल्या भल्यामोठ्या क्षेत्रफळावर प्रभाव कसा असेल? असा सवाल अंनिस आणि मविपने विचारला आहे.

विज्ञानात एखाद्या विधानाची चिकित्सा करावी लागते. चिकित्सेच्या अभावामुळे खरं ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो. झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे आमचा नागरिक सुशिक्षित होत नाही. आधुनिकता ही विचारात व आचारात यावी लागते. वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.हे विसरता कामा नये. विज्ञानाच्या कसोट्यामध्ये तर्क, अनुमान, प्रचिती व नंतर प्रयोग असे येते. अग्निहोत्र या प्रक्रियेत जंतुविघातक, रोगप्रतिबंधक गुणधर्म असलेले पदार्थ बाहेर टाकले जातात व विश्र्वशांती प्राप्त होते, हा दावा विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीस आलेली प्रचिती सार्वत्रीक व वारंवारीता असावी लागते.या विधानावर अग्निहोत्र टिकणार नाही.

वैज्ञानिक संकल्पनांचा वापर करून अवैज्ञानिक समज पसरविण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही .विज्ञानाच्या साहाय्याने देवी,प्लेग,कालरा आणि आता पोलिओ इ.रोग आटोक्यात आलेत. अग्निहोत्र तर फार प्राचीन आहे, मग जीवघेणे आजार, रोग कां बरे हटवू शकले नाहीत? अग्निहोत्रला शास्त्रीय आधार नाही. अग्निहोत्र माणसाला निरोगी व दिर्घायुषी राहण्यासाठी मदत करते, या विधानाची विज्ञानाच्या कसोटीवर तपासणी झाली पाहिजे असे म्हणणे महाराष्ट्र अंनिसतर्फे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे, अशोक तायडे, मोहन मेढे, आर.वाय.चौधरी यांनी तर मराठी विज्ञान परिषदेतर्फे सचिव प्रा.दिलीप भारंबे, प्रा.आर.ए.पाटील आदींनी मांडले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती विद्यामंदिर शाळेच्या मैदानावर उतरल्या १२ राशी

Next Post

संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात होळीचे नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा संपन्न

Next Post

संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात होळीचे नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo