Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही -डॉ. राजेंद्र शिंगणे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
ई ट्रायसिकलमुळे दिव्यांग बांधव आत्मनिर्भर होतील -डॉ.राजेंद्र शिंगणे

बुलडाणा(जिमाका)- जिल्हयात माहे 01 जून 2021 ते 24 ऑक्टोबर 2021 या कालावधीत एकुण 90 महसूल मंडळा पैकी 53 महसूल मंडळात (65 मि.मी पेक्षा जास्त पर्जन्यमान) अतिवृष्टी झाली. तसेच जिल्ह्यात या कालावधीत बऱ्याच भागात सततचा पाऊस पडत होता. त्यामुळे नदी, नाला व ओढे यांना पुरही आले. परिणामी, नदीकाठच्या शेतात पाणी साचून किंवा शेतातील पाण्याचे निचरा न झाल्यामुळे तसेच पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे देखील शेती पिकाचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत यंत्रणांनी पंचनामे केले, तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे आदेश पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. त्यानुसार पंचनामे करण्यातही आले.कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात माहे जून ते सप्टेबर 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या क्षेत्राचा पंचनामा पूर्ण करुन शासनास अहवाल सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये माहे जुलै 2021 मध्ये चिखली, मेहकर व सिंदखेड राजा तालुक्यातील जमीन खरडून गेलेल्या 287.95 हेक्टर करीता रु. 1.08 कोटी रक्कम शासनाकडुन प्राप्त होऊन 434 बधीत शेतकऱ्यांना वाटप झालेले आहे. तसेच माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2021 मध्ये जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 133755.82 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून बाधीत क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत.

या बाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आलेला आहे. याकरिता रक्कम रु. 91.24 कोटीची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. माहे ऑक्टोंबर 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजीत नुकसानीच्या अहवालानुसार 97560 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. याबाबत पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु आहे.जिल्ह्यातील 734722 लागवडीखालील क्षेत्रा पैकी अतिवृष्टी व पुरामुळे एकूण 132643 शेतकऱ्यांचे 136208 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. सततच्या पावसामुळे 155005 व माहे ऑक्टोंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजित अहवालानुसार 97560 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे, असे जिल्ह्यातील एकूण 388773 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून एकूण लागवडी खालील क्षेत्राच्या 53 टक्के क्षेत्र बाधित झालेले आहे.जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील सर्वच बाधित शेतीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत यंत्रणांकडून सातत्याने आढावाही घेण्यात आला. त्यामुळे एक विशिष्ट तालुका, गाव, परिसरातील नुकसान ग्रस्त भागच पंचनामा करू नये, असे होवू शकत नाही. यासंदर्भात अपप्रचार केल्या जात असून खोटी माहिती देण्यात येत आहे. तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा मदतीवर शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील कुणीही नुकसान ग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. शेतकरी बांधवांनी अशा खोट्या माहिती व अपप्रचारावर विश्वास ठेवू नये.

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीसाठी प्रशासना सोबत रहावे. प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

‘विद्यादानासाठी मदत करण्याचा मटा हेल्पलाईनचा उपक्रम प्रशंसनीय’ -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

Next Post

पाचोरा बस स्टॅन्ड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Next Post

पाचोरा बस स्टॅन्ड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d