Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अथक परिश्रम व खडतर मेहनतीतूनच घडतो यशस्वी उद्योजक -मंत्री छगन भुजबळ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
14/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षणाच्या आधुनिकीकरणाला चालना मिळेल -मंत्री छगन भुजबळ

नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून सावरण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत बेरोजगार युवकांना स्वत:च्या व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने अथक प्रयत्नातून फिरत्या विक्री केंद्रासाठी वाहन वाटपाचे हे उद्दिष्ट साकार झाले आहे. अथक परिश्रम व खडतर मेहनतीतूनच यशस्वी उद्योजक घडत असतो, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

येवला संपर्क कार्यालय येथे आयोजित मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सौजन्याने बेरोजरागारांना फिरते विक्री केंद्राचे वाहन वाटप करण्यात आले त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक भगवान सुरसे, मुख्य प्रबंधक मनिष कुमार गुप्ता, शाखा प्रबंधक मोहम्मद साबिर,समन्वयक सचिन पवार आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ही योजना अमलात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा होईल यादृष्टीने नियमात बसवून योजना अमलात आणली आहे.

या योजनेच्या माध्यमातून 6 लाख ते 10 लाखांपर्यंत किंमतीचे मालवाहतुकीसाठी वाहन उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्याला वाहनाच्या किंमतीच्या 5 टक्के रक्कम सुरवातीला भरावी लागते. यावर शासनाची 15 टक्केपासून 35 टक्केपर्यंत सबसिडी मिळते. व कर्जाच्या रकमेची 5 वर्षात परतफेड सुलभ हप्त्याने करता येते. या योजनेचा जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात आनंदा दुनबळे, वेता बोथरा, पुजा जाधव, बळीराम जाधव, दत्तात्रय पगारे, सुरेश गोरडे, कुणाल वाकचौरे, योगेश वाघ, रोहिनी महानुभाव, काशिनाथ खळे, सविता लासुरे, निलेश वाकळे, सरला रोकडे, मेघाली खरात, राकेश जगताप व सायली जमादार या 16 लाभार्थ्यांना मालवाहतुक वाहनांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. तर २५ लाभार्थ्यांना वाहन मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले.

Team Satymev Jayate

Previous Post

प.वि. पाटील विद्यालयात नेहरुंना अभिवादन

Next Post

बाल दिनानिमित्त जवाहर बालभवन तर्फे चित्रकला स्पर्धा संपन्न

Next Post
बाल दिनानिमित्त जवाहर बालभवन तर्फे चित्रकला स्पर्धा संपन्न

बाल दिनानिमित्त जवाहर बालभवन तर्फे चित्रकला स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo