Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघासोबत भारतातून 12 संघाचा सहभाग; आज होईल उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2025
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघासोबत भारतातून 12 संघाचा सहभाग; आज होईल उद्घाटन

जळगाव – (प्रतिनिधी) – अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई-१७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. ६ रोजी संध्याकाळी ५ वाजेला या स्पर्धेचे उद्घाटन होईल. ही स्पर्धा दि. ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान होईल. सोमवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यांच्यासोबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे व पदाधिकारी, जैन स्पोर्टस अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल व पदाधिकारी असतील.

सीआयएससीई बोर्डच्या अंडर-१७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेमध्ये आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, नॉर्थ इंडिया, वेस्ट इंडिया, पोर्टब्लेअर अंदमान निकोबार बेटसह दुबई या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघासोबत 12 राज्यांचे क्रिकेट संघ सहभागी होत असून 260 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. साखळी व बाद पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचे अनुभूती निवासी स्कूल मुख्य आयोजक आहेत. जैन इरिगेशन व जैन स्पोर्टस अकॅडमी मधील सहकारी त्यासाठी सहकार्य करत आहेत. साखळी सामने प्रत्येकी १५ षटकांचे असतील. तर उपांत्य व अंतिम सामने हे २० षटकांचे होतील. साखळी पद्धतीमध्ये १५ सामने होतील. अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल, जैन ड्रीम स्पेस-मेहरूण तलावाजवळ तसेच एमके स्पोर्टस-सावखेडा च्या दोघंही मैदानांवर सामने रंगणार आहेत.

ए, बी, सी, डी अशा चार ग्रृप मध्ये सामने..

सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ही ए, बी, सी, डी अशा चार ग्रृप मध्ये होईल. यात ‘ए’ ग्रृपमध्ये पोर्टबेअर अंदमान निकोबार, महाराष्ट्र, ओव्हरसीस, उत्तराखंड, ‘बी’ गृप मध्ये ओडीसा, नॉर्थ वेस्ट, पश्चिम बंगाल, ‘सी’ ग्रृपमध्ये बिहार अॅण्ड झारखंड, तामिळनाडू पी. ए. निको, मध्यप्रदेश, ‘डी’ ग्रुपमध्ये कर्नाटक अॅण्ड गोवा, नॉर्थ इंडिया, केरळ संघ असतील. यात ‘ए’गटात चार तर बी, सी, डी तीन गटांमध्ये प्रत्येक तीन संघ खेळतील. प्रत्येक गटातून प्रथम क्रमांकाचा संघ उपांत्य फेरीत लढत देतील. उपांत्य फेरीत ‘ए’ विरूद्ध ‘डी’ तसेच ‘बी’ विरूद्ध ‘सी’ असे सामने होतील. यातील विजेते अंतिम फेरीसाठी खेळतील.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ॲड.अरुण चव्हाणांच्या RTI मुळे लोणवाडी ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर; डस्टबिन खरेदीच्या खर्चावर प्रश्न विचारताच तीन दिवसांत काम पूर्ण!

Next Post

जळगाव भाजपच्या ‘पदवीधर प्रकोष्ट’ जिल्हाध्यक्षपदी शिरीषकुमार तायडे यांची नियुक्ती

Next Post
जळगाव भाजपच्या ‘पदवीधर प्रकोष्ट’ जिल्हाध्यक्षपदी शिरीषकुमार तायडे यांची नियुक्ती

जळगाव भाजपच्या 'पदवीधर प्रकोष्ट' जिल्हाध्यक्षपदी शिरीषकुमार तायडे यांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d