Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2026
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या विजयी खो खो संघासोबत क्रीडा शिक्षिका श्वेता कोळी तसेच शिवम सोनवणे

जळगाव, दि. १ प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनपा स्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हा क्रीडा संघ मैदानावर दि. १ ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात एकूण १६ संघांनी सहभाग घेतला. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या संघाचा पराभव करत अनुभूती स्कूलने विजेतेपद मिळविले.
या शानदार विजयामुळे अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाची पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द, शिस्त आणि सांघिक भावनेच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
या यशासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षिका श्वेता कोळी तसेच शिवम सोनवणे यांचे विद्यार्थ्यांकडून कसुन सराव करून घेतला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल स्कुल मधील सर्व शिक्षकवृदांनी कौतुक केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

Next Post

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Next Post
गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल - जिल्हाधिकारी रोहन घुगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo