Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रीयेस 1 जानेवारी पासून सुरूवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली व 2 रीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता 1 ली व 2 रीत प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, त्यासाठी  संबंधित विद्यार्थ्याला त्याचे  किंवा त्याच्या पालकांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रूपये 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे, इयत्ता 1 ली साठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 30 सप्टेंबर, 2020 रोजी 6 वर्षे पुर्ण असावे. त्यानुसार त्याचा जन्म  1 ऑक्टोंबर, 2013 ते 30 सप्टेंबर, 2014 दरम्यानचा असावा. तर इयत्ता 2 रीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थीने 2019-2020 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 1 ली मध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे आधारकार्ड असणे आवश्यक असून विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, पालक शासकीय/निमशासकीय सेवेत नसावा. या योजनेंतर्गत ज्या पालकांना आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेत 1 ली व 2 री च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा पालकांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा जन्मदाखला व आधारकार्डची साक्षांकित प्रत सादर केल्यांनंतर प्रवेश अर्ज 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी, 2020 या दरम्यान वाटप केले जाणार आहे. पालकांनी परीपूर्ण भरलेला अर्ज 5 मार्च, 2020 पूर्वी सादर करावा. इयत्ता 1 ली व 2 रीच्या प्रवेशासाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी 15 मार्च, 2020 रोजी बालमोहन विद्यालय, चोपडा, शिवकॉलनी शिरपुर रोड, चोपडा येथे उपस्थित रहावे. तर रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी 15 मार्च, 2020 रोजी शासकीय आश्रमशाळा, डोंगरकठोरा, ता.यावल येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयाच्या 02585-261432/262035 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अनुसूचित जमातीच्या 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या

Next Post

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न

Next Post
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्हा टास्क फोर्स समितीची  बैठक  संपन्न

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d