Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाकडून माहिती अधिकारात CCTV फुटेज ची माहिती देण्यास नकार-सिसिटिव्ही कॅमेरे शोपिस

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/07/2019
in माहितीचा अधिकार २००५
Reading Time: 1 min read
अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाकडून माहिती अधिकारात CCTV फुटेज ची माहिती देण्यास नकार-सिसिटिव्ही कॅमेरे शोपिस

जळगाव – (विषेश प्रतिनिधी) – येथील अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाकडे माहिती च्या अधिकारान्वये CCTV कॅमेरे फुटेज ची माहिती मागितली होती परंतु कॅमेरे असुन देखील माहीती देण्यास नकार दिला आहे.
याबाबत सविस्तर असे की, दिनांक १० जुन २०१९ रोजी माहिती अधिकार प्रशिक्षक व कार्यकर्ता दिपक सपकाळे यांनी जळगाव येथील सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या कडे माहितीचा अधिकार २००५ अन्वये अर्ज सादर केला होता व त्यात माहिती मागितली होती की, आपल्या कार्यालयातील सर्व CCTV कॅमेर्‍यांचे फुटेज DVD किंवा CD स्वरुपात मिळावेत.
परंतु जनमाहिती अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी ३ जुलै २०१९ रोजी पत्र पाठवले व त्यात स्पष्ट म्हटले आहे की “CCTV फुटेज च्या स्टोरेज ची माहिती पडताळणी केली असता ती या विभागात उपलब्ध नाही.
प्रश्न असा निर्माण होतो की, शासन हजारो, लाखो रुपये खर्च करून शासकीय कार्यालयात CCTV कॅमेरे बसवतात मग या CCTV कॅमेर्‍यांचा डाटा नेमका का उपलब्ध होत नाही.
एखाद्या सामान्य माणसाने शासकीय कार्यालयात तक्रार केली किंवा काही भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून ३५३ लावून अधिकारी मोकळे होतात आणि पुरावे म्हणून CCTV कॅमेरे फुटेज पण देतात, “बघा सदर इसम आमच्या कार्यालयात आला आहे व फुटेज मध्ये दिसत आहे”
पण जेव्हा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज सादर करुन एखाद अर्जदार CCTV कॅमेरे फुटेज माहितीची मागणी करतो तेव्हा मात्र डाटाबेसच् नाही, उपलब्ध नाही, CCTV कॅमेरे नादुरुस्त झाल्याने माहिती देता येत नाही असे कारणे देऊन माहिती देण्यास नकार दिला जातो.
याप्रकरणी वरिष्ठ कार्यालय दखल घेऊन काय कार्यवाही करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नगरदेवळा सुतगिरणी येथिल बंद घरांचे पत्रे चोरिला, चोरांचा धुमाकूळ

Next Post

जळगावातील काही स्वस्त धान्य दुकानदारांनी केला कोट्यावधीचा भ्रष्टाचार – शैलेंद्र परदेशी यांनी केला आरोप

Next Post
जळगावातील काही स्वस्त धान्य दुकानदारांनी केला कोट्यावधीचा भ्रष्टाचार – शैलेंद्र परदेशी यांनी केला आरोप

जळगावातील काही स्वस्त धान्य दुकानदारांनी केला कोट्यावधीचा भ्रष्टाचार - शैलेंद्र परदेशी यांनी केला आरोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo