मुंबई(प्रतिनीधी)- येथील समाजसेविका, करा फाऊंडेशन व अ.भा.चित्रपट सेना अध्यक्षा योगिता अरुण गवळी आणि मराठी सुप्रसिद्ध अभिनेते अक्षय वाघमारे यांचा विवाह कोरोनाचे गांभीर्य पाहता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने परिवारातील मंडळी समक्ष दगडी चाळ येथे संपन्न झाला.


मुंबईतील दगडीचाळ येथील अरूण गुलाबराव गवळी(डॅडी) व आशाताई गवळी (मम्मी) यांच्या कन्या योगीता आज लग्नबंधनात अडकल्या. हा विवाह सोहळा दगडी चाळीत पार पडला. या नवदाम्पत्याला अरुण व आशा गवळी यांनी भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले.











