Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अरेच्चा! राज्यात ‘इतक्या’ शाळा बोगस; आता थेट कारवाईचे आदेश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/05/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
अरेच्चा! राज्यात ‘इतक्या’ शाळा बोगस; आता थेट कारवाईचे आदेश

राज्यातील अनधिकृतपणे सुरू असलेल्या बोगस शाळांचा मुद्द गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.तर राज्यात जवळपास आठशेहून अधिक शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता या अनधिकृतपणे शाळांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बोगस शाळांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने आदेश जारी केले आहे. त्यामुळे आता बृहन्मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील बोगस शाळांवर गुन्हे दाखल होणार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

केंद्रीय मंडळाच्या नावाने राज्यभरातील वेगवगेळ्या जिल्ह्यात आठशेहून अधिक शाळा अनधिकृतपणे सुरू आहे. त्यामुळे याची गंभीर दखल शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी घेतली आहे. तसेच अशा अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. सोबतच राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या शाळांच्या वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश देखील शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यातच आता अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी त्यांच्यावर संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशातील सूचना:- वैध कागदपत्रे नसणाऱ्या शाळांवर प्रचलित आदेश, शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचलनालय स्तरावरून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे शाळा बंद करण्यात येणार.आवश्यकतेप्रमाणे संबंधित शाळांवर एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.तसेच अशा अनधिकृत शाळांवर 7/12 वर बोजा चढवण्याची कारवाई केली जाणार.विद्यार्थ्यांचे अन्य इतर शाळांमध्ये समायोजन करणे इत्यादी कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे़.

राज्यातील काही शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांकडून शिक्षण विभागाकडे अहवाल सादर करण्यात आला नाही़. त्यामुळे या संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक पुर्तता अहवाल तत्काळ स्वतंत्र हस्तबटवड्याद्वारे शिक्षण विभागास सादर करावे.

संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक पुर्तता अहवाल तत्काळ सादर न केल्यास टास्क फोर्सकडून दाखल होणाऱ्या फौजदारी गुन्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांना सहआरोपी करण्यात येणार

Team Satymev Jayate

Previous Post

गुंठा म्हणजे काय? जाणून घ्या भारतातील विविध भूमापन पद्धती

Next Post

येत्या ‘इतक्या’ महिन्यांत आदिवासी विकास विभागातील सर्व रिक्त जागा भरणार

Next Post
येत्या ‘इतक्या’ महिन्यांत आदिवासी विकास विभागातील सर्व रिक्त जागा भरणार

येत्या 'इतक्या' महिन्यांत आदिवासी विकास विभागातील सर्व रिक्त जागा भरणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo