
2020 मध्ये चीनमधील वूहान शहरापासून कोविड 19 कोरोना हा रोग पसरला सुरूवातीला या रोगाचे निदान आणि या रोगाविषयीची पुरेशी माहिती नसल्याने सरसकट आधी एक दिवस जनता कर्फ्यु नंतर 21 दिवस, मग 3 महिने नंतरच्या काळात तर उठ सूट कोणता पण पालकमंत्री उठायचा 2 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, वीकेंड लॉकडाउन करायचा एवढच काय तर गावातील सरपंच पण जनता कर्फ्यु आणि लॉकडाउन चे फर्मान सोडायचे.

कोरोनाने 2020 हे संपूर्ण वर्ष लॉकडाउन मध्येच गेले सामांन्याची आर्थिक परिस्थिती रसातळाला गेली. व पूर्ण आयुष्यभराची जमवलेली सेविँग या लॉकडाउन ने संपवली.

वर्ष संपले.. नवीन आशा घेऊन येईल अस वाटत होत पण 2021 मध्ये देखील मागील वर्षाप्रमाणे तीच परिस्थिती याचे साधे उदाहरण घ्यायचे झाले असल्यास 15 एप्रिल पासून महाराष्ट्र सरकारने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आता तो संपत नाही तोपर्यंतच अजून त्याला वाढविण्याची तयारी महाराष्ट्र सरकार करीत आहे.
सरकार कोरोना संसंर्ग थांबविण्यासाठी नाही तर आपण वर्षभरात गाफील राहून काहीच केल नाही. ही बाजु उघड होवू नये. म्हणून लॉकडाउन करते असा दाट संशय सामान्याचा मनात येतो.
वेळोवेळी या क्षेत्रातील तज्ञ एवढच काय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीनी पण काल परवा सागितले की लॉकडाउन हा राज्यांनी शेवटचा पर्याय ठेवावा.

आज कोरोनाला थोपवायचा कसा मास्क, सोशल डिस्टेन्सिंग वेळोवेळी हात धुवने आणि सँनिटांझरचा वापर करणे ही त्रि:सूत्री भारतातल्या बच्च्या बच्च्याना माहिती झाली कारण तो वर्षभरापासून TV, समाजमाध्यम आणि घरात देखील हेच ऐकतो आणि पाहत आहे.
शिवाय या आजारावर प्लाझ्मा थेरेपी, रेमडेसिवर 5 ते 6 कंपनीचे वँक्सीन यासारखे उपाय देखील आले असताना पुन्हा शासनाला लॉकडाउनच का दिसतोय?
कठोर निर्बंध घाला , नियमांवली बनवा आणि त्याची कसून अंबलबजावनी करा पण मायबाप सरकार आता लॉकडाउन उघडून आर्थिक व्यवहार सुरळीत करा.

आज उद्धव ठाकरे स्वतः जनते मध्ये न मिसळता फेसबुक लाईवच्या माध्यमातून फर्मान सोडतात . मुख्यमंत्रीच काय जनतेने निवडून दिलेल्या बोटावर मोजण्याइतके पण लोक प्रतिनिधी आज सामान्य जनतेमध्ये फिरताना दिसत नाही. कारण जनता खूप त्रस्त आहे आणि शासन निर्णयाना वैतागली आहे. हा ज्वालामुखी कधी उद्रेक घेईल हे सांगता येत नाही. कारण सरकार मग ते केंद्र असो वा राज्य कोरोना परिस्थिती हाताळताना पूर्णतः अपयशी झाले अशा सामान्यांचा रोष आहे.

ज्या चीन ने हा आजार आणला त्याने वूहान शहराबाहेर चीन देशामध्ये तो आजार पसरू दिला नाही. आज चीनमध्ये कोरोना पूर्णतः आटोक्यात आहे. शिवाय त्याची अर्थव्यवस्था देखील रुळावर आली आहे.
आणि आपण वर्षभरात काय केल जस्टीस फॉर SSR, बॉलीवुड ड्रग्ज कनेक्शन, कंगना बीएमसी वाद, TRP घोटाळा, 100 कोटीची खंडणी ,अर्णव vs नाईक वाद, जळगाव संत्तांतरण, कुंभमेळा, निवडणुका वाझे अँन्टेलीया प्रकरण, केंद्र व राज्य सरकार याच्यां तू तू मैं मै यातच आपल्या सरकारने आणि मीडियाने देखील वर्ष काढल व जेव्हा दुसरी लाट आली,अचानक कोरोना केसेस वाढु लागल्या तेव्हा सरकार भानावर आल आणि आपण वर्षभरात कोरोना थोपविन्यासाठी काहीच केल नाही ही लाट आपल्याच्याने झेपनार नाही. आपली विरोधक,मिडीया,सामान्यामध्ये कीरर्कीरी होऊ नये म्हणून तर लॉकडाउन केला नसेल ना सरकारने…??
खर तर सरकार आपले अपयश लपविण्यासाठी लॉकडाउन लावत आहे..!! जर सरकारला वाटत असेल कोरोना संक्रमणाला रोखण्याचा एकमेव पर्याय लॉकडाउन आहे तर लॉकडाउन लावण्याआधी पण काही नियम व अटी शर्ती,तरतुदी,शासकीय पँकेज सरकारी आस्थापनांना द्यायला हव्या होत्या.

आज तुम्ही लॉकडाउन लावून सर्वसामान्याच अर्थचक्र थांबवल. पण ज्यांनी बँकेचे लोन ( वाहन कर्ज, शिक्षण कर्ज, गृह कर्ज घेतलय) त्यांचे EMI पुढील दोन महिन्यापर्यंत स्थगित करण्याचे सरकार म्हणून बँकांना आदेश दिले नाही. बचत गट, विम्याचे हप्ते, दुकान भाडे, घर भाडे वसूल करता येणार नाही असे आदेश काढले नाही.
शासनाच्या अख्त्यारितील असणारी वीज बिल माफ केली नाहीत.
जर लॉकडाउन काळात सामान्याचे अर्थचक्र पुर्णबंद आहे तर त्यानी हे हप्ते कुठून आणि कसे फेडायचे हे साध गणित शासनाला समजत नाही का?
आज 80 % टक्क्यापेक्षा जास्त कामगार वर्ग असंघटित श्रेत्रात आहे. त्यात काम चालू तर पगार चालू या तत्त्वावर हे श्रेत्र काम करते. यांच्यासाठी शासनाने काय केले..?? ज्यांच तळहातावर पोट आहे ज्यांची अवस्था जायेंगे काम को तो खायेगे शाम को अशी आहे. त्यांच्या उदर भरण्यासाठी ,उदर निर्वाहासाठी काय केल सरकारने.??
लॉकडाउन लागण्यापूर्वी 1500-1500 रुपए रिक्षाचालक आणि बांधकाम मंजूराना देणार होता त्याची किती लाभार्थीच्या बँकेत पैसे टाकलेत. आज असे किती उद्योग, व्यापार, दुकाने ही बंद आहेत ज्यातील कामगार वर्गाला काम नाही म्हणून पगार नाही अश्या कामगार वर्गासाठी सरकारने काय केले.सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आज बहुतांश कामगार वर्ग एक वेळेच्या जेवणाला महाग झाला आहे.

जरा आँनलाईन सोडून ऑफलाइन त्याच्यांत मिसळा मगच त्याचा भावना तुम्हाला कळतील कारण ऑनलाइन दुरवर भावना समजतील अस तंत्रज्ञान अजून तरी विकसित व्हायच बाकी आहे.
आज आपल्या लॉकडाउन या निर्णयाच समर्थन कोण करत असेल तर फक्त सरकारी कर्मचारी वर्ग आणि लोक प्रतिनिधीच कारण त्यांची तर मौजच चालू आहे .काम ना करता पगार येत आहे. मग त्याना कशाला लॉकडाउनच्या झडा पोचतील.
कोरोना या आपत्ती काळात लोकशाहीचा राजा सामान्य, गोर गरीब, व्यापारी, मजूर वर्गाचच खूप शोषण होत आहे. आणि तथाकथित सोकॉलड लोकशाहीतील राजांचे सेवक यात सरकारी नोकर ( आरोग्य व पोलिस कर्मचारी सोडून) लोकप्रतिनिधी (ऑन ग्राउंड काम करणारे सोडून) याच पोषण होतय….!!!

पण आता जास्त दिवस हे चालणार नाही. कारण केव्हा ना केव्हा सामान्यांचा राग ,रोष यांचा उद्रेक होन अटळ आहे. तेव्हा माज करणाऱ्याचा माज नक्की लोकशाहीच्या राजाकडून उतरवला जाईल.










