Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी;योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/07/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी;योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज

मुंबई, दि. 22 : नवे शैक्षणिक वर्ष 2022-23 आता सुरु होत असून राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे.

अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, मेडीकल, नर्सिंग, फॅशन डिझायनींग, टुरीजम, पत्रकारीता, मास मीडिया, चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहेत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय 16 ते 32 वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपयांपेक्षा कमी तर ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपयांपेक्षा कमी असावी. राज्य शासनामार्फत मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत असून यामधून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय 18 ते 32 वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत असावी, अशा अटी आहेत. दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनांसाठी व्याजदर फक्त 3 टक्के इतका आहे. विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्षात कर्जाची परतफेड करायची आहे, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

योजनेच्या लाभासाठी malms.maharashtra.gov.in या लिंकवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावरील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा. महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जिल्हास्तरीय कार्यालयांची तसेच योजनेची माहिती उपलब्ध असून या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्जही करता येईल. राज्यस्तरावर महामंडळाच्या ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात संपर्क साधावा किंवा 022-22657982 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संत सावतानगरमध्ये वृक्षारोपणाप्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या सह ८० वर्षाच्या आजी व नातवंडांनी वृक्षसंवर्धनाची घेतली प्रतिज्ञा;गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांचा उपक्रम

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo