Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आचार्य गजाननराव गरूड पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
आचार्य गजाननराव गरूड पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला

शेंदुर्णी, ता. जामनेर ;- धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव गरूड फाऊंडेशन आयोजित आचार्य गजाननराव गरूड स्मृती व्याख्यानमालेचे वर्ष पंधरावे पुष्प पहिले- आदर्श सरपंच मा.श्री भास्करराव पेरे पाटील (पाटोदा, छत्रपती संभाजीनगर) यांनी आदर्शगाव या विषयावर गुंफले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वालन व प्रतिमापूजन करून व्याख्यानमालेचे उ‌द्घाटन करण्यात आले.

श्री भास्करराव पेरे पाटील यांनी सांगितले कि, गावात अभिनव उपायांच्या माध्यमातुन टॅक्स संकलनामध्ये वाढ केली. त्यातून मोफत स्यानिटरी नॅपकिन, वर्षभर मोफत दळनाची सोय, घरोघरी नळ आणि सोलर व्दारे गरम पाणी उपलब्ध करून दिले. पाणी बचत, स्वच्छता, पर्यावरण पुरक उपक्रमांच्या माध्यमातून गावाचा विकास केला. स्वच्छ पाणी, वृक्षारोपण, शिक्षण, साफ सफाई, बाहेरचे खाणे टाळणे, निराधारांना आधार देणे हा आदर्श सर्वच गावांनी घेण्याची गरज आहे व गांधीजींच्या स्वप्नातील गावं निर्माण करायची आहे. सर्वांनी राजकारण न करता गावाच्या विकासासाठी एकोपा कायम ठेऊन काम केले पाहिजे.
प्रास्ताविकातून व्याख्यानमाला आयोजनामागची भूमिका प्राचार्य एस.पी.उदार यांनी मांडली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन श्री संजय गरूड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बापूसाहेबांनी आपल्या कार्यातून आपली ओळख निर्माण केली व गावाचे नाव मोठे केले हे सांगितले. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री सतीश काशीद, संचालिका सौ.उज्वला काशिद, संचालक श्री सागरमल जैन, संचालिका सौ. देवश्री काशिद, संचालक अभिजीत काशिद, ,श्री राजमल भागवत,श्री शांताराम गुजर, श्री सुधाकर बारी, प्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, सर्व पत्रकार बंधू, सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद, पालक, शेंदुर्णी नगरपंचायत चे मा. सदस्य, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री पी.जी. पाटील यांनी, तर आभार उपप्राचार्य प्रा. दीपक पाटील यांनी मानले.

Team Satymev Jayate

Tags: jalgaonjamnershendurni
Previous Post

शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा जैन हिल्स कृषि महोत्सव – रविशंकर चलवदे

Next Post

अमळनेरातील महिलेवर अत्याचार ; एकावर गुन्हा

Next Post
अमळनेरातील महिलेवर अत्याचार ; एकावर गुन्हा

अमळनेरातील महिलेवर अत्याचार ; एकावर गुन्हा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo