Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आज १७ फेब्रुवारी अभिनेता प्रसाद ओक यांचा वाढदिवस

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2020
in लेख, विशेष
Reading Time: 1 min read
आज १७ फेब्रुवारी अभिनेता प्रसाद ओक यांचा वाढदिवस

प्रसाद ओक यांचे शालेय शिक्षण भावे स्कूल, व बीएमसीसी पुणे येथे झाले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमासारखाच एक कार्यक्रम पुण्यात चारुदत्त आफळे सादर करायचे. यात चंद्रशेखर महामुनी गायक होते. त्यांच्या टीमसोबत प्रसाद ओक कोरस म्हणून गात असत.
प्रसाद ओक यांनी करिअरची सुरुवात नाटकांपासून केली होती. रणांगण, भ्रमाचा भोपळा या नाटकांमधून प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. पण सगळ्यात महत्वाचा टप्पा होता तो सारेगमप या झीच्या रिअॅलिटी शोचा. प्रसाद ओक यांच्या आई संगीत विशारद आहेत पण प्रसाद ओक हे कधीच गाणे शिकले नाही, त्यांना उपजतच गात्या गळ्याची देणगी मिळाली आहे, त्यानी आपल्या करिअरची सुरुवातही गाण्याच्या कार्यक्रमातनं केली होती, ‘सारेगमप’ स्पर्धेतून गायक म्हणूनही प्रसाद ओक यांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. सारेगमपचा विजेता बनल्यानंतर प्रसाद ओक हे झी मराठीचा ब्रँड अँबेसेडर बनले, एका वाहीनीचा चेहरा बनणारा प्रसाद हा पहिला मराठी कलाकार. त्यानंतर स्टार वाहिनीनेही प्रसाद ओक यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केले होते. आतापर्यंत ७० ते ७५ सिनेमे, ८० ते ८५ मालिका आणि २५ नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा प्रसाद ओक यांनी उमटवला आहे. कच्चा लिंबू या चित्रपटाने प्रसाद ओक दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आले. त्यानंतर त्यांनी हिरकणी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटातील त्यांची शिवाजी महाराजांची भूमिका गाजली.

‘अवघाचि संसार’ मालिकेतली खलनायकी वळणाची भूमिकाही असो वा ‘नांदी’ नाटकातली स्त्री भूमिका, प्रसाद ओक यांनी सर्वच भूमिकांना योग्य न्याय दिला. प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःचे फॅन निर्माण केले आहे. नांदी या नाटकात त्यांनी रुक्मीणीची भूमिका केली होती. नांदीचे एकूण १०० प्रयोग केले. ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘नांदी’ या संगीत नाटकांतील त्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक झाले. ‘दामिनी’, ‘घरकुल’, ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाची संसार’, ‘असंभव’, ‘वादळवाट’ आणि ‘होणार ‘सून मी ह्या घरची’ या प्रसाद ओक यांच्या मालिका विशेष लोकप्रिय ठरल्या, ‘धतिंग धिंगाणा’, ‘खेळ मांडला’, ‘हाय काय नाय काय’, ‘फुल ३ धमाल’, ‘दोघात तिसरा’, ‘क्षण’, ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ हे प्रसाद ओक यांचे गाजलेले सिनेमे आहेत.

– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समता सैनिक दलाच्या राष्ट्रीय संघटक पदी धर्मभूषण बागुल यांची निवड

Next Post

विश्वविख्यात मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचे उत्तर महाराष्ट्रात विविध प्रेरणादायी व्याख्याने

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo