Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

जळगाव(प्रतिनिधी)- जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमीत्‍त निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या आत्महत्या व घ्यावयाची काळजी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी आत्महत्या रोखण्यासाठी विविध विषयावर चर्चा देखिल करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ मयुर मुठे यांची प्रमुख उपस्थीती होती तर डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड हे देखिल उपस्थीत होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख मान्यवराचे स्वागत पुष्पगूच्छ देउन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ विलास चव्हाण यांनी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन का साजरा करतो हे विषद करून सांगितले. प्रमुख मान्यवर डॉ. मयुर मुठे यांनी चित्रफित व उदाहरणाचा दाखला देत निवासी वैद्यकिय अधिकार्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. यात आत्महत्या करणारी व्यक्‍ती कशी ओळखावी व त्या व्यक्‍तीला आत्महत्येपासून कसे परावृत्त करावे याबाबत मार्गदर्शन केले.

उपस्थीतांचे शंका निरसन प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून करतांना डॉ मुठे यांनी वैद्यकिय क्षैत्रातील वाढता ताण तसेच आत्महत्या रोखण्यासाठी उपाय योजनावर प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ विलास चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे निवासी वैद्यकिय अधिकारी व विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गोविंद यादव, डॉ मुजाहीद शेख यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

Next Post

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo