Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमदार निधीतून विश्व रुहानी केंद्र येथील पेव्हर ब्लॉक विकासकामांचे लोकार्पण;दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल भाविकांनी मानले आमदारांचे आभार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमदार निधीतून विश्व रुहानी केंद्र येथील पेव्हर ब्लॉक विकासकामांचे लोकार्पण;दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल भाविकांनी मानले आमदारांचे आभार

चाळीसगांव – येथील विश्व मानव रुहाणी केंद्र येथे ४ महिन्यांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी केंद्रातील भाविकांच्या मागणीच्या अनुषंगाने विश्व मानव रुहाणी केंद्र येथील आवारात पेंव्हर ब्लॉक च्या कामाचे भूमिपूजन केले होते, आमदार स्थानिक विकास निधीतून चारच महिन्यात सदर काम पूर्ण झाले व आज दि.९ जानेवारी रोजी विश्व मानव रुहाणी केंद्र चाळीसगाव च्या १८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सदर लोकार्पणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून व फीत कापून सदर पेव्हर ब्लॉक चे उद्घाटन करण्यात आले, सदर कार्यक्रमास उपस्थित राज्य निगारण कमिटी अध्यक्ष गणेश धनगर सर यांनी मनोगतातुन आमदारांचे आभार मानले, खरच आपण फक्त आमदार नसून समाजाचे सेवक आहात व आपण दिलेला शब्द पूर्ण केला त्या बद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत अशी भावना सर्व सत्संग भक्त परिवाराच्या वतीने व्यक्त केली, यावेळी लीगल कमिटी प्रमुख किशोर अहिरराव, निगारण कमिटी राज्य सदस्य राजेश भोयर, कासार साहेब, बापू सोनवणे, सुनील सोनार, माजी नगराध्यक्ष डी आर दादा चौधरी, मा नगरसेवक रविंद्र चौधरी, देसले नाना, mseb उपकार्यकरी अभियंता विनोद बाविस्कर, कैलास पाटील, जितेंद्र रवींद्र पाटील, आनंद कोळी, अतुल पाटील सर, चेतन पाटील, दामू अण्णा पाटील, रमेश चौधरी, भगवान चौधरी आदी उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, अध्यात्मिक व वारकरी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात वाढल्याने समाजात असणाऱ्या सर्व धार्मिक संप्रदाय याविषयी नेहमीच आपुलकी वाटत आली आहे. आपल्या निधीच्या माध्यमातून धार्मिक केंद्रांसाठी सोयीं सुविधा उपलब्ध करून देता येत असल्याने तो निधी खऱ्या अर्थाने सत्कारनी लागत असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

प्रस्तावना करत असताना दीपक चौधरी यांनी सांगितले की, वारकरी पुत्र मंगेश दादा यांनी माझ्या आई वडिलांना पंढरपूर ला घेऊन जात विठ्ठल रुखमाई यांचे दर्शन घडवून आणले. माझी आई मला पंढरपूरहून परत आल्यानंतर म्हणाली, मंगेश दादांनी आमची पंढरपूर येथे आमच्या मुलांप्रमाणेच सेवा केली व हे ती आजही नेहमीच कौतुकाने सर्वाना सांगत असते असा अनुभव त्यांनी  उपस्थितांना सांगितला. सूत्र संचालन पाटील सर यांनी केली, प्रस्तावना दीपक चौधरी यांनी  तर आभार गौरव माने यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश

Next Post

सार्वजनिक वाहतूक नीटनेटकी, दर्जेदार असणे चांगल्या परिवहन व्यवस्थेचा कणा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d