Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ईपीएस ९५ पेन्शनर्सला सन्मानपुर्वक जगण्यासाठी न्याय मिळावा म्हणून तहसिलदारांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
ईपीएस ९५ पेन्शनर्सला सन्मानपुर्वक जगण्यासाठी न्याय मिळावा म्हणून तहसिलदारांना निवेदन

राष्ट्रीय संघर्ष समीती बुलढाणा तर्फे ईपीएस ९५ पेन्शन लढा सूरू असून जळगाव जिल्हा संघटनेच्या सदस्यांनी काल तहसिलदार कार्यालयात जावून सन्मानपुर्वक जगण्यासाठी न्याय मिळावा अशी आर्त हाक निवेदनाव्दारे दिली आहे.
यात जिल्हाध्यक्ष म्हणून अरविंद नारायण भारंबे, उपाध्यक्ष रमेश बाबुराव नेमाडे,सचिव दिनकर निवृत्‍ती पाटील, तुकाराम पगारे हे सदस्य उपस्थीत होते. या निवेदनात आर्त हाक देतांना वस्तूस्थीती मांडून लवकरात लवकर न्याय मिळून सन्मानपुर्वक जगण्याचा न्याय मिळण्यासाठी विनंती केली आहे. संपुर्ण भारतात सूतगिरणी, साखर कारखाना, औद्योगिक कामगार, परीवहन मंडळ, राज्य विद्युत मंडळ , राज्य महामंडळ, को आप बँक, वृत्‍तपत्र समुहातील कामगार, या प्रमाणे खाजगी क्षैत्रातील १८६ प्रकारात काम करणारे ६७ लाख निवृत्‍त पेन्शनधारक सदस्य असून या पेन्शनधारकांना एकत्र आणण्याचे कार्य राष्ट्रीय संघर्ष समीती गेल्या ४ वर्षापासून करीत आहे. समीतीचे मुख्यालय बुलढाणा महाराष्ट्र येथे आहे. मा. कंमाडर अशोक राउत यानी २०१७ साली निवृत्‍त पेन्शन धारकांच्या समस्या जाणून घेत या समीतीची स्थापना केली. २००/— ते २५००/— इतक्या तुटपूंज्या निवृत्‍ती वेतनात उदारनिर्वाह करणे कठीण होते. गेल्या ११३० दिवसापासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयसमोर साखळी उपोषण देखिल सूरू असून देशभरातून सदस्य यात सहभागी होत आहे. याचबरोबर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मा. खा. हेमामालीनी यांच्यासोबत संघर्ष समीतीच्या बैठका होउन मा. मोदीजीनी यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. यात पेन्शनधारकांना ७५००/— अधिक महागाई भत्‍ता, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ३१ मे १७ पत्र परत घेवून २३ मार्च १७ नुसार जास्तीत जास्त पेन्शन मिळावे. पेन्शनधारक व वारसांना आयुष्यमान भारत योजनेत मोफत वैद्यकिय उपचार, २३ मार्च १७ च्या भविष्य निर्वाह निधी पत्रान्वये कार्यवाही व्हावी, सेवेत असतांना ज्या कर्मचा—यांनी पेन्शन पर्याय स्विकारला नाही त्यांना अंशदान स्विकारून ५०००/— अधिक महागाई भत्‍ता मिळावा. अशा मागण्या केलेल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नाक-कान-घसा विकारावर आता करू या मात!

Next Post

सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू होणार; शासनाच्या निर्देशानुसार क्रीडा स्पर्धांना परवानगी द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार;पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo