Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उद्योग क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असलेली माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी योगदान द्यावे – विजय आहेर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/04/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
उद्योग क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असलेली माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी योगदान द्यावे – विजय आहेर


जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) – वार्षिक उद्योग पाहणी (Annual Survey of Industries) हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) आकडेवारीचा महत्वपूर्ण स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (GDP) तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते. तर राज्यातील उद्योग पाहणीचे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालय या राज्य शासनाच्या सांख्यिकी विषयक नोडल यंत्रणेकडून करण्यात येत असल्याने यंत्रणेने ही माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी आपले योगदान द्यावे. असे आवाहन विजय आहेर, संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी व्यक्त केले.


वार्षि उद्योग पाहणीच्या क्षेत्रकामातून संकलित करण्यात येणाऱ्या माहितीची गुणवत्ता वाढविण्यासाठी व क्षेत्रकामाचा दर्जा उंचाविण्याच्या दृणष्टीकोनातून राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा 19 ते 21 एप्रिल, 2023 या कालावधीत नियोजन विभागाच्या अधिनस्त अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई तर्फे यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. आहेर हे बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महासंचालक, यशदा एस. चोकलिंगम हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून सौम्या चक्रवर्ती, उपमहानिदेशक, औद्योगिक सांख्यिकी विभाग, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोलकाता, राष्ट्रीय नमूना पाहणी विभागाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक श्री. आलोककुमार, उद्योग विभागाचे प्रतिनिधी श्री. पी. डी. रेंदाळकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे, विजय आहेर, संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे व्यासपीठावर उपस्थित होते.


श्री सौम्या चक्रवर्ती, उपमहानिदेशक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, भारत सरकार यांनी जगात बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येत असल्याचे सांगून आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वात अधिक उद्योगांची पाहणी केली जात असल्याची अभिमानास्पद बाब नमूद करुन माहिती विहीत वेळेत संकलित करुन उपलब्ध करुन देण्याचे महत्व अधोरेखित केले. विजय आहेर, संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी या प्रशिक्षणाचा पुरेपुर लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच मनुष्यबळाची कमतरता असली तरी कामाचे योग्य नियोजन करुन शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व गुणवत्तापुर्ण उपलब्ध करुन देणेच्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उद्योगांना सांख्यिकी संग्रहण अधिनियम 2008 खालील तरतुदींनुसार माहिती देणे बंधनकारक असल्याने उद्योगांनी देखील या कामासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन केले.
श्री. चोकलिंगम, महासंचालक यशदा यांनी देशातील सर्व्हेचा इतिहास, माहितीचे महत्व आणि त्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित/अनपेक्षित परिणाम याबाबत उदाहरणांसह अतिशय रंजक पद्धतीने उपस्थितांच्या ज्ञानात भर घातली. माहिती तंत्रज्ञानात होत असलेल्या नवनवीन प्रगतीद्वारे उपलब्ध होत असलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग यासारखे तंत्रज्ञान याचा विचार करुन माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये देखिल सुधारणा होण्याच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. वार्षिक उद्योग पाहणीच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्रीमती दिपाली धावरे, उपसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना अवगत केले. श्री. नवेन्दु फिरके, सहसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले.


कार्यशाळेमध्ये रणबीर डे, श्री. बाप्पा करमरकर, उपसंचालक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, भारत सरकार कोलकाता, डॉ. प्रदिप आपटे, प्रख्यात अर्थतज्ञ व प्राध्यापक, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्रीनिवास शिर्के आणि महेश चोरघडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. जितेंद्र चौधरी, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे सत्र नियंत्रक व तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संबंधित अनुभवी प्रशिक्षकांद्वारे वार्षिक उद्योग पाहणीच्या कामाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण संगणकावर घेण्यात आले व प्रशिक्षणार्थींच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.), उपमहानिदेशक, यशदा, पुणे हे अध्यक्ष व श्री.पुष्कर भगूरकर, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यातील प्रादेशिक सांख्यिकी कार्यालयांचे दिनेश वाघ, सहसंचालक व जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक श्री. राजेंद्र बोरसे आणि क्षेत्रकाम करणारे 164 अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले. असे रा. पु. बोरसे, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जाती दावा पडताळणीतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 24 ते 27 एप्रिल दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन

Next Post

शासकीय योजना दारोदारी- सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव चा उपक्रम

Next Post
शासकीय योजना दारोदारी- सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव चा उपक्रम

शासकीय योजना दारोदारी- सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव चा उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d