Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी जिल्ह्यात सुरू होणार शासकीय वसतिगृह!

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी जिल्ह्यात सुरू होणार शासकीय वसतिगृह!

जळगाव,;- जिल्ह्यातील एरंडोल, चाळीसगाव व यावल याठिकाणी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला – मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह करण्यात येणार आहे. प्रत्येकी १०० क्षमतेची मुले व मुलींचे एक असे एकूण सहा वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. या वसतिगृहासाठी ९२०० क्षेत्रफळाची भाडेतत्त्वावर इमारत देऊ इच्छिणाऱ्या मालकांनी, व्यक्तींनी १५ जानेवारीपर्यंत समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागाचा १५ जून २०२१ च्या शासननिर्णयान्वये ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी “संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजना” सुरु करण्यात आलेली आहे. यात मुलांसाठी ४१ व मुलींसाठी ४१ अशी एकूण ८२ (प्रत्येकी १०० क्षमतेची) वसतीगृह सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यापैकी प्रथम टप्प्यात मुलांसाठी – १० व मुलींसाठी १० अशी एकूण २० (प्रत्येकी १०० क्षमतेची) वसतीगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ही वसतीगृहे ही औरंगाबाद व नाशिक या विभागातील अहमदनगर, जालना, आणि बीड या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत.

आता उर्वरीत ३१ मुलांची व ३१ मुलींची अशी एकूण ६२ शासकीय वसतीगृहे सुरु करणेबाबत प्रस्तावित असून त्यापैकी जळगांव जिल्ह्यात तालुक्यांच्या ठिकाणी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह एरंडोल, चाळीसगांव, यावल, या ठिकाणी १ मुलांचे व १ मुलींचे (प्रत्येकी १०० क्षमतेची) असे प्रत्येकी २ वसतीगृह सुरु करणेकरीता (शासन मंजुरीच्या अधिन राहून) इमारत भाडेतत्वावर घेणेसाठी इमारत बांधकाम ९२०० क्षेत्रफळ (चौ.फुट) सर्व सोयी-सुविधायुक्त शहराच्या मध्यवर्ती भागात विद्यालय/महाविद्यालय पासून जवळ असलेली इमारत भाडेतत्वावर देणेसाठी उपलब्ध असल्यास १३ मार्च, २०२३ च्या शासन परिपत्रकातील अटीच्या अधीन विहित नमुन्यात आपले इमारत भाडेतत्वावर देणेबाबतचा प्रस्ताव अर्ज १५ जानेवारी २०२४ पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगांव या कार्यालयास सादर करण्यात यावे.असे आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

काँग्रेसमध्ये लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांचा प्रवेश

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी नीती आणि प्रशासकीय धोरणांची आधुनिक युगातील प्रासंगिकतावर चर्चासत्र

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d