Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एका तपानंतर तरुणाचा तिरळेपणा शस्त्रक्रियेने झाला दूर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील नेत्ररोग तज्ञांचे यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – लहानपणी सायकलचे हॅण्डल लागले आणि तिरळेपणा आला.. त्यातच कुटूंबियांचे अज्ञान, त्यामुळे उपचारापासून वंचित..परिणामी तिरळेपणाची सवय करत तब्बल बारा वर्षे उलटली… कुणी तरी देवाच्या रुपात आले आणि डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या मार्ग दाखविला.. आणि आश्‍चर्य एका तपाच्या तपश्चर्येनंतर तिरळेपणावर यशस्वी शस्त्रक्रियमुळे बावीस वर्षीय तरुणाची दृष्टी सामान्य झाली असून तिरळेपणातून त्याला दिलासा मिळाला आणि हे सर्व शक्य झाले ते केवळ डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील नेत्ररोग विभागाच्या प्रयत्नांमुळेच… गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वतंत्र नेत्ररोग विभाग कार्यरत असून तज्ञ डॉक्टरांचे येथे टिम सेवा देत आहे. अशातच एका बावीस वर्षीय तरुणाला घेऊन त्याचे नातेवाईक रुग्णालयात आले आणि नेत्ररोग विभागातील सर्जन डॉ.प्रिती लालसरे-पाटील यांना भेटले, याप्रसंगी डॉक्टरांनी त्याची हिस्ट्री जाणून घेतली.

दरम्यान हा तरुण ९-१० वर्षांचा असतांना सायकलवरुन पडला आणि हॅण्डलचा फटका त्याच्या डाव्या डोळ्याला लागला, तेव्हापासून त्याल तिरळेपणाची समस्या सुरु झाली. तिरळेपणावर उपचार होतात, पुन्हा पूर्ववत डोळा होऊ शकतो याची कुटूंबियांना कल्पना नव्हती आणि तिरळेपणाचा न्यूनगंड मनात ठेवून त्या तरुणाचे आयुष्य काढणे सुरु झाले. आयुष्यातील बालपण आणि तारुण्याची सुरुवात असा १२ वर्षांचा काळ गेला, एक तप उलटले. आणि आश्‍चर्य एके दिवशी वृत्‍तपत्राच्या माध्यमातून तसेच डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या लोकप्रियतेमुळे त्या तरुणाला तिरळेपणावरील उपचाराची माहिती मिळाली आणि तो रुग्णालयात आला.

याप्रसंगी डॉ.प्रिती यांनी त्याच्या संपूर्ण डोळ्यांची तपासणी केली आणि तिरळेपणावरील शस्त्रक्रिया करुन दृष्टी पूर्ववत होऊ शकते असे सांगितले आणि त्या तरुणासह नातेवाईकांना आनंद झाला आणि त्यांनी लगेचच ऑपरेशनसाठी तयारी दाखविली. गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली निदान, चाचण्या, उपचार या सुविधा असल्याने लगेचच त्याच्या फिटनेससाठी आवश्यक असलेल्या रक्‍त, लघवी अशा विविध चाचण्या करुन घेण्यात आल्यात. एक ते दिड तासात शस्त्रक्रिया झाली आणि ती यशस्वी ठरली, आत त्या तरुणाला पूर्वीप्रमाणे स्पष्ट, मान खाली वर न करता दिसायला लागल्याने त्याने आभार मानले. ही शस्त्रक्रिया नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रिती लालसरे-पाटील यांनी केली असून त्यांना डॉ.अनुजा गाडगीळ यांचे सहकार्य लाभले. तिरळेपणावर वेळीच उपचार गरजेचे – डॉ.प्रिती लालसरे-पाटील तिरळेपणा हा जन्म:जात असो किंवा आयुष्यात काही घटनांमुळे आलेला असो, त्यावर उपचार उपलब्ध आहे. वेळीच उपचार केले तर अगदी चष्मा लावून सुद्धा रुग्ण बरा होवू शकतो, शस्त्रक्रियेची आवश्यकत भासत नाही. महत्वाचे म्हणजे अशा प्रकारचे काही व्यंग आले की व्यक्‍तीच्या मनात न्यूनगंड तयार होतो, त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो, त्यासाठी वेळीच लक्ष देवून उपचार घेतले तर सामान्य आयुष्य जगण्याचा आनंद घेता येतो. – डॉ.प्रिती लालसरे-पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बोरी धरणाचा एक दरवाजा उघडला;नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

Next Post

सानुग्रह अनुदानासाठी पात्र ऑटोरिक्षा परवानाधारकांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

Next Post

सानुग्रह अनुदानासाठी पात्र ऑटोरिक्षा परवानाधारकांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d