Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एम आय डी सी तील सेक्टर ‘के’ मधील खुली जागा स्मशानभूमीसाठी तात्पुरती अधिग्रहित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
एम आय डी सी तील सेक्टर ‘के’ मधील खुली जागा स्मशानभूमीसाठी तात्पुरती अधिग्रहित


जळगाव, दि. 20 – कोविड19 विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सेक्टर के मधील ओपन स्पेस-10 (81728) चे क्षेत्र 1500.00 चौमी ही जागा पुढील 6 महिन्यांकरीता अधिग्रहीत करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी आज काढले आहे.
कोविडमुळे मृत्यु झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील नेरी नाका येथील स्माशनभूमी मनपामार्फत आरक्षित करण्यात आली आहे. याठिकाणी सध्या 24 ओटे आणि गॅसदाहिनी सुरु असून याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. तथापि, तात्पुरत्या स्वरुपात स्मशानभूमी उभारण्यासाठी एमआयडीसीतील ही जागा अधिग्रहीत करण्यात येत आहे. याठिकाणी कोरोना बाधित किंवा संशयित रुग्णांच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने येथे मनपा प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 321 नुसार प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी ही जागा स्मशानभूमी म्हणून घोषित करण्यात यावी. तसेच या ठिकाणी आवश्यकतेनुसार ओटे तयार करणे आणि शक्य झाल्यास गॅसदाहिनी तयार करण्यात यावी. त्याचप्रमाणे स्मशानभूमीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरुपात कुंपण तयार करणे, पाण्याची व्यवस्था करणे, जैव कचरा व्यवस्थापन करणे, अग्निरोधक सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच स्मशानभूमीच्या ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावाची नोंदणी करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. स्मशानभूमीच्या ठिकाणी अंत्यविधीकरीता लागणारे लाकूड (सरण) पुरविण्यासाठी संबंधित पुरवठादार यांना पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात यावेत. तसेच अंत्यविधीकरीता पुरेसे लाकूड (सरण) उपलब्ध करून देणे व लाकूड (सरण) ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पत्र्याचे शेड उभारण्यात यावे. तसेच या ठिकाणी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या कोविड नियमावलीचे पालन करुन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात दिले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तांदुळवाडी येथे , शेत शिवारात चोरांचा धुमाकुळ

Next Post

आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी

Next Post
आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी

आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo