Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कतरिनाच्या प्रेमात पडला “हा” अभिनेता, हर्षवर्धन कपूरने केले कन्फर्म

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
कतरिनाच्या प्रेमात पडला “हा” अभिनेता, हर्षवर्धन कपूरने केले कन्फर्म


गेल्यावर्षी दिवाळी पार्टीत कॅट अर्थात कतरिना कैफ आणि विकी कौशल पहिल्यांदा कॅमे-यांत कैद झाले आणि दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. अर्थात अद्याप दोघेही यावर काही बोलले नाही. पण तरिही बोभाटा झालाच. आता काय तर अभिनेता हर्षवर्धन कपूर यानेच कॅट व विकीचे रिलेशनशिप कन्फर्म केले आहे.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यात काहीतरी खिचडी शिजतेय. हे आम्ही नाही तर गेल्या काही महिन्यांपासून येत असलेल्या बातम्या म्हणताहेत. सध्या कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या डेटींगच्या बातम्यांना जोर चढला आहे.

झूमवर एका चॅट शोदरम्यान हर्षवर्धन जे बोलायला नको होते ते बोलून बसला. इंडस्ट्रीतील रिलेशनशिपच्या चर्चा ख-या असतात की खोट्या?, असा प्रश्न त्याला केला गेला. यावर हर्षवर्धनने अचानक विकी व कॅटचे नाव घेतले. ‘विकी व कतरिना सोबत आहेत आणि हे सत्य आहे,’ असे तो म्हणाला. विशेष म्हणजे यानंतर लगेच ‘क्या यह बताकर मैं मुसीबत में पडने वाला हूं?’, असे तो म्हणाला.

आता हर्षवर्धन अडचणीत येणार की नाही, हे आम्हाला माहित नाही. पण हर्षवर्धनने एक लव्ह स्टोरी कन्फर्म केलीये, हे मात्र नक्की आहे.
अलीकडे विकी कौशल कतरिनाच्या घरी दिसला होता. याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. ई टाईम्सने हा व्हिडीओ शेअर केला होता.  
2019 मध्ये अंबानीच्या दिवाळी पार्टीत कतरीना व विकी एकत्र दिसले होते.  पार्टी संपल्यानंतर दोघेही एकत्र बाहेर पडले होते. पण बाहेर मीडियाला पाहताच दोघांनीही मार्ग बदलला होता. पापाराझींना बघताच कतरीना अक्षरश: भींतीआड लपली होती. दुसरीकडे ‘तो मी नव्हेच’ अशा थाटात विकी कतरीनाला इग्नोर करून एकटा कारमध्ये बसून निघून गेला होता. हा सगळा सीन कॅमे-यात कैद झाला होता.

‘कॉफी विद करण’ या शोमध्ये विकीने कतरिनाला डेट करत असल्याच्या बातम्या नाकारल्या होत्या. कतरिना मला आवडते. पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे तो म्हणाला होता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तूर पिकाच्या राजेश्वरी वाणाच्या मिनीकिटसाठी 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत प्रमाणित बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत प्रमाणित बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत प्रमाणित बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo