Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कतारच्या नव्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट; वर्ल्ड कप फुटबॉल पाहण्यास येण्याचे राज्यपालांना निमंत्रण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कतारच्या नव्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट; वर्ल्ड कप फुटबॉल पाहण्यास येण्याचे राज्यपालांना निमंत्रण

मुंबई(प्रतिनिधी)- कतारचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी बुधवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.सर्व जगाचे लक्ष लागून असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद भूषविण्यास कतार सिद्ध झाला असून राज्यपालांनी वर्ल्ड कप पाहण्यासाठी कतारला यावे असे निमंत्रण अल-सुलैती यांनी यावेळी राज्यपालांना दिले.

भारतीय लोक कतारच्या विविध क्षेत्रांत मोठे योगदान देत असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.कतारने दोहा येथे भारतीय दूतावासाला तसेच भारतीय राजदूतांच्या निवासस्थानासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे नमूद करून भारतानेदेखील कतारच्या वाणिज्य दूतावासासाठी मुंबई येथे जमीन उपलब्ध करून द्यावी अशी विनंती अल सुलैती यांनी केली.

कोरोना संसर्गाच्या काळात कतारने भारताला वैद्यकीय द्रवीभूत ऑक्सिजन निःशुल्क उपलब्ध करून अनेक लोकांना जीवदान दिल्याबद्दल राज्यपालांनी वाणिज्यदूतांकडे आभार व्यक्त केले.कतारने भारतात विविध क्षेत्रांत गुंतवणूक करावी व भारताच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. मुंबईत पाहिजे असलेल्या जमिनी संदर्भात दूतावासाने प्रस्ताव दिल्यास आपण त्याचा पाठपुरावा करू असे राज्यपालांनी वाणिज्यदूतांना सांगितले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्याचा 8862 कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत मांडले

Next Post
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत मांडले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d