Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कांताईंच्या स्मृतीदिनी भवरलाल जैन यांच्या प्रेरणादायी विचारांच्या फलकाचे भूमिपुत्राकडून अनावरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कांताईंच्या स्मृतीदिनी भवरलाल जैन यांच्या प्रेरणादायी विचारांच्या फलकाचे भूमिपुत्राकडून अनावरण

जळगाव दि.7 प्रतिनिधी- भवरलाल जैन यांच्या पत्नी ‘कांताई’ यांचा आज (ता.6) स्मृती दिन तसेच शेती-मातीत राबणा-या शेतकऱ्यांचा सखा बैल यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. यानिमित्त शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी विचार जाता-येता डोळ्यांसमोर असावे, यासाठी भूमिपूत्राने घराच्या दर्शनी भागावर भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांचे फलक अनावरण केले.

धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील जी.नाना.पाटील गोशाळेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील हे त्या भूमिपूत्राचे नाव आहे. फलक अनावरणप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहकारी अनिल जोशी, अखिल भारतीय महिला बचत गटाच्या अध्यक्षा कृषीभुषण सौ.सुनंदा पाटील, सचिव छाया पाटील, सतखेडा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच कृषिभुषण शरद पाटील, आदर्श शेतकरी गंगाधर पाटील, सौ.मंडाबाई पाटील, डॉ. पुरूषोत्तम बी पाटील, सबवेअर काॕन्टॕक्टर अशोक पाटील, आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील, चंपालाल पाटील,भगवान पाटील, वसंत पाटील, नवल दोधू पाटील, जे.डी.आर्ट यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेती आणि गायींचे संगोपनाचे महत्त्व सांगतांना प्रभाकर पाटील भवरलालजी जैन यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. ते म्हणतात, ‘दहावी पास झालो त्यावेळेस वडिल गंगाधर पाटील सालदारकी करायचे, वडिलांकडे 22 गुंठे जमीन तिही नापिक होती. त्यामुळे रोजगारासाठी जैन पाईपमध्ये लागलो.

भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांच्या नेतृत्व गुणांमुळे प्रभावित झालो. मोठ्याभाऊंचे ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केले तर देशाच्या विकास होतो’असे प्रेरणा देणाऱ्या विचार आत्मसात करण्याचा संकल्प केला. या संकल्पनेतुनच ‘ मुक्ताई’ हे देशी गायीचे संगोपन केलेले उत्पादन सुरू केले. यामध्ये देशी गायीचे दुध, तुप, ताक, अग्निहोत्र साठी लागणाऱ्या गौ-या, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेण आणि लाकुड मिश्रण करून एका विशिष्ट पध्दतीने गौ-या तयार केल्या जातात. यातुन महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य असल्याचे प्रभाकर पाटील सांगतात. प्रत्येक घरात देशी गाय असावी यासाठी ते प्रयत्न करतात. दुध संकलनातुन शेतकऱ्यांना हमी भाव देत ‘मुक्ताई’ हे सतखेडा गावातील उत्पादन मोठ्या शहरांमध्ये पोहोचवतात. हे सर्व कार्य जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या प्रेरणेमुळेच शक्य झाल्याचे प्रभाकर पाटील गौरवाने सांगतात. भवरलालजी जैन यांचे समाज घडविणारे विचार मला व माझ्या पुढच्या पिढीच्या कायम स्मरणात रहावे व गावातील तरूणांना वेगळे काही करणाची ऊर्जा देत रहावे यासाठी घराच्या दर्शनी भागावर कायमस्वरूपी फलक लावल्याचे प्रभाकर पाटील अभिमानाने सांगतात.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रिव्हाइज्ड बेसिक कोर्स कार्यशाळेस प्रारंभ

Next Post

राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होणार परीक्षा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Next Post

राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होणार परीक्षा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d