Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द जिल्हा उपनिबंधक यांची माहिती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
23/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द जिल्हा उपनिबंधक यांची माहिती

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द झालेली असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाकडून आदेश पारीत झाल्यानंतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा व रावेर यांच्या मतदारांची मतदार यांदी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होती.

तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव, भुसावळ, बोदवड, जामनेर, धरणगाव व यावल या बाजार समित्यांना मतदारांची प्राथमिक/तात्पुरती मतदार यादी सादर करण्याबाबत या कार्यालयामार्फत कळविण्यात आले होते. मात्र, बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका क्रमांक 11669/2021 व इतर संलग्न याचिका यात मा. उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद यांनी 18 नोव्हेंबर 2021 रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश पारीत केलेला आहे.

या आदेशास अनुसरुन मा. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील 22 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये प्राधिकरणाकडील 6 व 21 ऑक्टोबर 2021 रोजीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. सदर आदेशान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार यादीवर आक्षेप/हरकती मागविण्याची प्रक्रिया राबवलेली आहे ती प्रकिया रद्द करण्यात आलेली आहे.

या आदेशामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द झालेली असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून आदेश पारीत झाल्यांनतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव, यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गहू बियाण्याचे अनुदानावर वितरण

Next Post

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना १५ डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत तर १५ जानेवारी पासून सादरीकरणाला सुरुवात होणार

Next Post
महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना १५ डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत तर १५ जानेवारी पासून सादरीकरणाला सुरुवात होणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d