Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृषी योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कृषी योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन


जळगाव, (जिमाका) दिनांक 17 :- कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जा|द्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. सन 2021-22 करिता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सन 2020-21 मध्ये महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करणारे परंतू कोणत्याही योजनेसाठी निवड न झालेले शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबींमध्ये बदल करू शकतील. असे अर्ज सन 2021-22 करिता ग्राह्य धरले जातील त्याकरिता त्यांच्याकडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही.
शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरील ‘ शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट किंवा सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. ‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. आधार क्रमांक नसल्यास प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेता येईल. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास [email protected] या ई- मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे संचालक, विस्तार व प्रशिक्षण कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Next Post

ऑलनाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post
ऑलनाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

ऑलनाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo