Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृषी विज्ञान केंद्र जळगाव येथे माहिती अधिकार चर्चासत्र संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/10/2022
in माहितीचा अधिकार २००५
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत जळगाव येथे स्थापन कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद , तेलबिया संशोधन केंद्र व कृषी तंत्र विद्यालय येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता माहिती अधिकार अधिनियम 2005 ची सुयोग्यरीतीने अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला , कार्यशासाठी प्रमुख मार्गदर्शक माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे व पाचोरा तालुका अध्यक्ष पंकज पाटिल यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला . याप्रसंगी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्र जळगावचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती , कृषी तंत्र विद्यालयाचे कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. योगेश पाटिल , तेलबिया संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. के. टी. सूर्यवंशी , माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे , पाचोरा तालुकाध्यक्ष पंकज पाटिल यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मांडतांना डॉ. हेमंत बाहेती म्हणाले की , अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्यास माहिती अधिकाराचा योग्य उपयोग करत नागरिक व अधिकारी यांच्यात समन्वय साधला जाईल व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये या कायद्याविषयी जनजागृती होऊन भिती कमी होईल.

तसेच कृषी विज्ञान केंद्र जळगाव हि तदर्थ योजना असतांना देखील क्षेत्रीय कार्यालय म्हणुन विद्यापीठ प्रशासनामार्फत स्वतंत्र जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांना पदनिर्देशित करण्याकरीत श्री. अमोल कोल्हे यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याने डॉ. बाहेती यांनी कोल्हे यांचे विशेष आभार मानले . सार्वजनिक प्राधिकरण व त्याच्या जबाबदाऱ्या , माहितीचा अधिकार अधिनियम 2005 शासन आदेश परिपत्रके आणि महत्वपूर्ण न्याय निर्णय याविषयी अमोल कोल्हे यांनी सविस्तर माहिती सांगितली . तसेच सर्व शासकीय कार्यालयांनी माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदींचे तंतोतंत पालन केल्यास व एक अर्जदाराने विचारलेली माहिती कार्यालयात जाहिर केल्यास शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या अर्जांची संख्या खुप कमी होईल तसेच या कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे हि शासकीय कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे , त्यामुळे नागरीकांशी सौजन्याने वागल्यास अधिकाऱ्यांना शासकीय योजना अधिक कार्यक्षमतेने योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांची मदत घेता येईल असे प्रतिपादन अमोल कोल्हे यांनी केले . कार्यशाळे करिता उपस्थित जन माहिती अधिकारी यांना माहिती पुस्तिकेचे वितरण देखील अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले . श्री पंकज पाटील यांनी माहिती अधिकार कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्वाच्या संकल्पना त्या अंतर्गत नियम व जन माहिती अधिकारी यांची कार्यपद्धती व अधिकारी , कर्मचारी तसेच सुज्ञ नागरी नागरिक यांच्या समन्वय साधून शासकीय कार्यालयाचे काम अधिकाधिक लोकाभिमुख कसे करता येईल याविषयी आणि माहिती अधिकार अधिनियमातील विविध कलमांविषयी मार्गदर्शन केले . तद्नंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे समाधान देखील अनिल कोल्हे व पंकज पाटिल यांनी चर्चा सत्रात केले .


सदर कार्यशाळे करिता कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक माहिती अधिकारी संदीप गायकवाड , जन माहिती अधिकारी किरण जाधव , कृषी तंत्र विद्यालय चे सहाय्यक जन माहिती अधिकारी गावंडे सर , तेलबिया संशोधन केंद्राचे सहाय्यक माहिती अधिकारी टिकार सर तसेच या तिन्ही केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शंका समाधान करून घेतले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. हेमंत बाहेती यांनी केले. सूत्रसंचालन श्री. किरण मांडवडे तसेच आभार प्रदर्शन श्री. वैभव सूर्यवंशी यांनी मानले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची उमवीत कमेटी नियुक्त

Next Post

माऊली फाऊंडेशन भडगाव व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न

Next Post

माऊली फाऊंडेशन भडगाव व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo