Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : कृषिमंत्री दादाजी भुसे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : कृषिमंत्री दादाजी भुसे

कृषी संजीवनी सप्ताहात कृषिमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

चंद्रपूर,दि. 4 : जिल्ह्यात जास्तीत जास्त समृद्ध आणि प्रगतशील शेतकरी निर्माण व्हावे, यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. ते आज चंद्रपूर दौऱ्यावर आले होते.

Maha Info Corona Website

नागभिड येथील नवखळा तर ब्रह्मपुरी येथील सायगाटा येथील प्रगतशील शेतकरी सोमेश्वर देव्हारे व शिवदास कोरे यांच्या पेरू व सेंद्रिय शेतीला भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी ‘कृषी संवाद’ साधला.

शेतकऱ्यांमध्ये कृषी योजनांची प्रचार प्रसिद्धी व जनजागृतीसाठी हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै ते 7 जुलै कृषी संजीवनी सप्ताह सुरु आहे. यामध्ये सर्व कृषी व कृषी संलग्न विभागाच्या सहकार्याने त्या त्या विभागाच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच प्रगतशील शेतकऱ्यांशी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त संवाद साधण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला  तसेच राज्यातील दीड लाख शेतकरी महिलांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करताना शेतीची कामे कमीत कमी श्रमामध्ये कशी होतील. तसेच महिलांना शेती संदर्भातील प्रशिक्षण देऊन शेती व्यवसाय कसा पुढे जाईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

उमेदच्या माध्यमातून प्रशिक्षित महिला तयार होत आहे. सातबाऱ्यावर कुटुंबप्रमुख पुरुषांबरोबर महिलांचे नाव लावून महिलांना शेती संदर्भातील योजना मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

नागभीड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे यावेळी सत्कार करण्यात आले. ना.दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रगतशील शेतकरी यांनी त्यांच्या विविध शेती संदर्भातील प्रयोग इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन ठरेल असे कार्य करावे. तसेच यावेळी एकात्मिक फलोत्पादन विकास  अभियानांतर्गत संरक्षित शेती व  व्यवस्थापन भात व तूर पिकावरील कीड रोगांचे व्यवस्थापन पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

दरम्यान, प्रगतशील शेतकरी सोमेश्वर देव्हारे यांच्या शेतामध्ये ना. दादाजी भुसे यांनी भेट दिली. तसेच पेरू शेतीची पहाणी केली.प्रगतशील शेतकरी अरुण नरुले, रंजना बांबुळे, सोमेश्वर देव्हारे यांनी शेतीमध्ये राबविलेले नवनवीन प्रयोग तसेच सेंद्रिय शेती याविषयीचे मनोगत व्यक्त केले. जिद्द आणि मेहनतीने प्रयत्न केले तर शेती नक्कीच स्वयंपूर्ण होणार असल्याचे मत यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, मंत्री दादाजी भुसे यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील सायगाटा येथील कृषिभूषण प्रगतशील शेतकरी शिवदास कोरे यांची सेंद्रिय शेती व भाजीपाला लागवड क्षेत्रात भेट दिली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी संवाद साधतांना शेतकऱ्यांनी उत्पन्न घेताना ते उत्पन्न दर्जेदार कसे होईल. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

नवखळा येथील कार्यक्रमाचे संचालन मंडळ कृषी अधिकारी सोनाली गजभे तर सायगाटा येथे तालुका कृषी अधिकारी सुनिल ताकटे यांनी केले. आभार प्रदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी दिगंबर तपासकर यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सोलापूर शहरातील कोरोना चाचण्या वाढवणार

Next Post

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo