Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना मुकाबल्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेंतर्गत राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरीकांचे सर्वेक्षण पूर्ण;२४५५ पथके कार्यरत

नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई, दि. ४: कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे दीड हजार व्हेंटीलेटर, अडीच लाख एन ९५ मास्क उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे संवाद सांगितले.
राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत सोशल डिस्टंसिंग राखावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यात आरोग्य पथकांमार्फत क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेतून सर्वेक्षणाबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ९ लाख लोकांचं ट्रेसिंग करण्यात आले आहे. याकामासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आवश्यकता भासल्या राज्यात आरोग्यसेवेसाठी पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ असावे यासाठी राज्यातील आर्युवेदीक, युनानी, होमिओपॅथी या आयुष डॉक्टरांची सेवा घेता यावी याकरिता त्यांना आठवडाभरात कोरोनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजच आयुषच्या २५० मुख्य प्रशिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेकडे पुरेसे उपकरणे आणि साधनसामुग्री आहे. २५ हजार पीपीई कीट्स, दीड हजार व्हेंटीलेटर असून अडीच लाख ९५ मास्क उपलब्ध आहेत. राज्यात लवकरच नविन व्हेंटीलेटर उपलब्ध होणार असून आवश्यकता भासल्यास केंद्र शासनाकडून उपकरणांचा पुरवठा राज्याला केला जाईल, असेही आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सागितले.
खासगी दवाखाने बंद ठेवणे असून डॉक्टरांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. नागरिकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवी त्यासाठी योग्य आहार, व्यायाम, परेशी झोप यासोबतच ‘क’ जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन करताना नागरिकांनी स्वयंशीस्त पाळावी घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनाच्या परिस्थितीत समाजामध्ये दुही माजविणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा

Next Post

“लॉकडाऊन’मध्ये अत्यावश्‍यक सेवांना मिळणार घरबसल्या ई-पास;परिवहन विभागाचा अभिनव उपक्रम

Next Post
“लॉकडाऊन’मध्ये अत्यावश्‍यक सेवांना मिळणार घरबसल्या ई-पास;परिवहन विभागाचा अभिनव उपक्रम

"लॉकडाऊन'मध्ये अत्यावश्‍यक सेवांना मिळणार घरबसल्या ई-पास;परिवहन विभागाचा अभिनव उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo