Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना संकटात अर्थचक्र गतिमान ठेवणाऱ्या उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कोरोना संकटात अर्थचक्र गतिमान ठेवणाऱ्या उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

मुंबई, दि. 23 : संपूर्ण देश कोरोनाच्या संकटात असताना उद्योजकांनी नेटाने अर्थचक्र सुरु ठेवले. अनेक उद्योगांनी कामगारकपात तसेच वेतनकपात न करता दुपटीने काम केले. कोरोनासारखी संकटे येतात. मात्र सर्वांनी अंतःकरणपूर्वक काम केले तर देशाला कुठल्याही संकटावर मात करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. 

कोरोना काळात अर्थचक्र गतिमान ठेवणाऱ्या राज्यातील ५१ उद्योजकांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि.२३) राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई तरुण भारत तर्फे आयोजित या ‘कोविड योद्धा उद्योजक सन्मान’ सोहळ्याला मुंबई तरुण भारतचे मुख्य संपादक किरण शेलार व व्यापार पणन प्रमुख रविराज बावडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. 

कोरोनाकाळात देशात स्वच्छतासेवक, वॉर्डबॉय, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, अशासकीय संस्था, शासकीय अधिकारी, उद्योजक आदी सर्वांनी स्वयंप्रेरणेने काम केले. अंतःकरणापासून केलेल्या चांगल्या कामामुळे आत्मिक समाधान लाभते व त्याहीपेक्षा जनसामान्यांचे आशीर्वाद मिळतात असे सांगून कोरोना संपला असे न समजता प्रत्येकाने भविष्यातही सावधगिरी बाळगावी अशी सूचना राज्यपालांनी केली. 

राज्यपालांच्या हस्ते बिपीन शाह, डॉ कविता खडके, कुशल देसाई, वैशाली बोथरा, महेश खेडकर, प्रबोध ठक्कर, एस. गणपती, मिलिंद संपगावकर, प्रवीण पोहेकर, संजय दुबे, सचिन शिंदे, आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सन्मानित उद्योजकांची गौरवगाथा असलेल्या ग्रंथाचे देखील राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव नगरपरिषद अग्निशामक दल कर्मचारी बांधवांना राखी बांधून राष्ट्रवादी महिलांनी केला रक्षाबंधन सण साजरा

Next Post

बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Next Post

बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo