Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची तपासणी करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची तपासणी करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश

जळगाव(जिमाका)- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करावी, त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व्यक्तींला कोरोना लसीचा पहिला डोस लवकरात लवकर देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज दिले.

जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, सहायक आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकरी अरुण आनंदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त यो. कों. बेंडकुळे आदी उपस्थित होते.

आयुक्त श्री. गमे म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी गाफील न राहता बाधित आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करावी. बाधित रुग्ण ज्या भागात आढळेल तो भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, त्याचबरोबर भविष्यातील धोके लक्षात घेता जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन जिल्हा ऑकि्सजन निर्मितीत स्वयंपूर्ण होईल यावर भर द्यावा. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस प्रभावी असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीला पहिला डोस लवकरात लवकर देण्यासाठी कृती आराखडा तयार करुन तसे नियोजन आरोगय विभागाने करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या प्रवासाची हिस्ट्री लक्षात घेऊन बाहेर गावावरुन रेल्वे अथवा एसटी ने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करावी, बाधित आढळणाऱ्या रुग्णांचे आयसोलेशन करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण शासनाच्या प्राधान्यक्रमावर -उपमुख्यमंत्री

Next Post

राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मंजुरी -कामगार मंत्री हसन मुश्रीफ

Next Post
सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजवाणी करा -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मंजुरी -कामगार मंत्री हसन मुश्रीफ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d